Telangana Election 2023: तेलंगणाच्या लढाईला महाराष्ट्रातून भाजपच्या शिलेदारांची फौज सज्ज; कोपरा सभांचा धडाका

BRS-BJP Politics : तेलंगणा राज्याच्या ११९ सदस्यांच्या विधानसभेची मुदत जानेवारी २०२४ मध्ये संपत आहे.
Telangana Election 2023
Telangana Election 2023Sarkarnama

Assembly Elections 2023 : तेलंगणा राज्याच्या ११९ सदस्यांच्या विधानसभेची मुदत जानेवारी २०२४ मध्ये संपत आहे. यंदाच्या डिसेंबरपर्यंत तिथे निवडणुकाही होतील. आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तिथे आपल्या अस्तित्वासाठी लाढाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षही तिथे कामाला लागला आहे. तेलंगणात सध्या भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे. त्यांनी आताच ११५ सदस्यांची यादी जाहीर केली. तर दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रातील आमदारांना चाचपणीसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि लातूर जिल्ह्यातील औशा'चे आमदार अभिमन्यू पवार यांनी तेलंगणात डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आताच या तिघांनी मंचेरियाल जिल्ह्यात वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात कोपरा सभांचा धडाका सुरू केला आहे.

Telangana Election 2023
MLA Chandrikapure News : अजित पवारांचे कट्टर समर्थक आमदार चंद्रिकापूरे मेळाव्याला गैरहजर, उलटसुलट चर्चांना फुटले पेव !

चार विधानसभा मतदारसंघ असलेल्या जिल्ह्याचा काही भाग महाराष्ट्र राज्याला लागून आहे. या मंचेरियाल (तेलंगणा) जिल्हा भारत राष्ट्र समिती (बीआरएस)चा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत अरविंद रेड्डी गद्दाम (टीआरएस, 2009), नदीपेल्ली दिवाकर राव (टीआरआस, 2014, 2018) विजयी ठरले आहेत. या भारत राष्ट्र समितीच्या गडाला छेदण्यासाठीच महाराष्ट्रातील भाजपचे आमदार कार्यरत झाले आहेत. एका जिल्ह्यात दोन भाजप आमदारांनी कोपरासभांचा धडाका लावला आहे. मात्र गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजप इथे सतत तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.

आदिलाबाद जिल्ह्यातून ऑक्टोबर 2016 ला वेगळा झालेल्या या मंचेरियाल जिल्ह्यात गौंडी जनतेचे प्राबल्य आहे. हा भाग बीआरएस पक्षाचा गड मानला जातो. तिथे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मंचेरियाल (तेलंगणा) जिल्ह्यातील इस्त्रोचे शास्त्रज्ञ चंद्रशेखर मंदियाला यांचे `चंद्रयान तीन`च्या यशाबद्दल सत्कारही केला. कोपरासभा आणि अशा सत्कार समारंभातून जनतेच्या मनाला साद घालण्याचा प्रयत्न हे दोन्ही आमदार करीत आहेत.

Telangana Election 2023
Sharad Pawar News : 'अजितदादा आमचेच नेते..' ; शरद पवारांच्या विधानावर सर्वपक्षीय नेत्यांना काय वाटतं ? ; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम...

दोघांनाही अचानक नवीन मतदारसंघात निवडणूक लढवून विजय मिळविण्यासाठी काय काय व्यवस्थापन करावे लागते, याचा चांगलाच अनुभव आहे. दोन दोन वेळा विजय मिळविलेल्या प्रस्थापित आमदारांसमोर कोणत्या पद्धतीने आव्हान उभे करायचे, याचाही या दोघांनाही गेल्या निवडणुकीत अनुभव आलेला आहे. या अनुभवाचा फायदा तेलंगनातील उमेदवारांना किती होईल, हे निकालानंतरच कळेल. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी नांदेड, सोलापूर, लातूर, धाराशिव, कोल्हापूर इथल्या तीनशेपेक्षा अधिक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सीमेलगतच्या जिल्ह्यात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे आमदार तेलंगणात जात आहेत तर तेलंगणाचा पक्ष राज्यात येतो आहे. निवडणुकीच्या लढाईत कोण किती ताकद लावतो, आणि कोणाला यश मिळेल हे लवकरच कळेल.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in