'आप'चा मास्टर प्लॅन ठरला; 9 राज्यांसाठी नऊ जणांवर मोठी जबाबदारी

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) ११७ जागांपैकी ९२ जागा जिंकत ऐतिहासीक विजय मिळवला
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsarkarnama

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) भरघोस यश मिळविल्यानंतर देशातील इतर राज्यांमध्ये आपल्या संघटनेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. विशेष करुन या वर्षी किंवा पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) आहेत. त्या राज्यांवर आता आपने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सध्या आपने नऊ राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करताना प्रभारी आणि संघटनेतील लोकांची नावे जाहीर केली आहेत. या राज्यामध्ये दक्षिण भारतातील राज्यांचाही समावेश आहे.

Arvind Kejriwal
आमदारकी पदरात पडताच काँग्रेस नेत्याचा खासदारकीचा राजीनामा

पक्षाच्या वतीने नऊ राज्यांतील नवनियुक्त अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नऊ राज्यांमध्ये आसाम (Assam), छत्तीसगड (Chhattisgarh), गुजरात (Gujarat), हरियाणा (Haryana), हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब, राजस्थान आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. या राज्यातील प्रभारी आणि संघटनेच्या लोकांची नावे आपने जाहीर केली आहेत. ही माहिती पक्षाच्या वतीने ट्वीट करत देण्यात आली आहे.

Arvind Kejriwal
Prajwala Scam:भाजपला झटका ; ठाकरे सरकार करणार विजया रहाटकरांची चैाकशी

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ११७ जागांपैकी ९२ जागा जिंकत ऐतिहासीक विजय मिळवला. या विजयानंतर आता आपने पक्षाच्या राष्ट्रीय विस्तारावर अधिक भर दिला आहे. सध्या पक्षाने नऊ राज्यांमध्ये संघटना विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात इतर राज्यांमध्येही याचा विस्तार केला जाणार, असल्याचे आपच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com