Thackeray Vs Shinde : सुनावणी संपताच सत्तासंघर्षावर सिब्बलांनी केलेल्या ट्विटचा अर्थ काय?

Kapil Sibal : सिब्बलांनी केले सूचक ट्विट...
Thackeray Vs Shinde :  Kapil Sibal
Thackeray Vs Shinde : Kapil SibalSarkarnama

kapil Sibal Tweet : मागील सात महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर संपली. ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी घटनेतील कलमे, परिशिष्टे व तरतुदींचा किस पाडत, आपापली बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता शिंदे गटाच्या अपात्रतेबाबत काय निर्णय दिला जातो, यावर सत्तासंघर्षाचा पुढचा अंक सुरू होणार आहे. सद्या तरी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घटनापीठाने निर्णय राखून ठेवला आहे.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ व ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल सध्या चर्चेच केंद्रस्थानी आले आहेत. सुनावणी संपल्यानंतर सिब्बल यांनी एक सूचक ट्विट केले आहे. "पक्षांतर, आया गया राम और सिया राम दोनो इक्कट्टे नही हो सकते.." असे आशयाचे सूचक ट्विट केले आहे. सिब्बल यांनी केलेल्या या ट्विटनंतर राजकीय विश्वात अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. राखून ठेवलेल्या निकालात आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Thackeray Vs Shinde :  Kapil Sibal
Pimpri News : पंतप्रधान आवास योजनेत छत्रपती संभाजीनगरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ कोटी रुपयांचा घोटाळा?

पक्षांतर कायद्यासंदर्भात सिब्बल यांचा युक्तिवाद :

न्यायालयाची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी या निकालाच्या संदर्भात सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवे. केंद्रीय निवडणूक आयोगानकडून राजकीय पक्षाला गृहीत धरलेले नाही, आयोगाने केवळ विधिमंडळ सद्स्यांच्या बहुमत लक्षात घेऊन निर्णय दिला आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीत निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसे असतात? एकाच चिन्हावर निवडून आलेले सदस्य वेगळा निर्णय घेऊ शकतात का? पक्षाच्या नेत्यावर आम्ही विश्वास बाळगत नाही, असे फुटीर गट म्हणू शकतो का?

Thackeray Vs Shinde :  Kapil Sibal
NCP News : होर्डींग राष्ट्रवादीचे, आवाहन सरन्यायाधीशांना; अन् त्यासाठीचे शब्द भाजपाच्या दिवंगत नेत्याचे !

पक्षचिन्हावर निवडून आलेले, पक्षाशी संबंध तोडून, पुन्हा पक्षावर दावा कसा करू शकतात? एकनाथ शिंदेंवर विधिमंडळात अपात्रतेची कारवाई सुरू होती. अशा वेळी राज्यपाल एकनाथ शिंदेंना सत्ता स्थापनासाठी कसे काय निमंत्रण देऊ शकतात? ही त्यांची कृती नियमांना डावलणारी होती. या मुद्यावरून राज्यपालांच्या अधिकारांचीही चाचपणी करण्यात यावी. राज्यघटनेचे संरक्षण हेच राज्यपालांचे कर्तव्य असते. मात्र अलीकडील काळात राज्यपालही राजकारण करत आहेत, हे दुर्दैवी आहे.

Thackeray Vs Shinde :  Kapil Sibal
Pune News : सरकारचे उशिराने शहाणपण; हुतात्मा राजगुरू स्मारक आराखडा समितीत अखेर स्थानिकांचा समावेश !

विधिमंडळाचा पक्षनेता, विधिमंडळ पक्षाचा प्रतोद, यांची निवड करण्याबाबतच्या, विधिमंडळ सभागृह अध्यक्षांचे अधिकार काय? केवळ बहुमताने पक्षनेता, प्रतोद बदल्ण्यात येतो का ?पक्षांतर्गत वादाची समीक्षा कोर्टाकडून केली जाऊ शकते का?पक्षाने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे सबंधित आमदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. बहुमत जरी असले, तरी आमदार आसाममध्ये दूर बसून, पक्षनेता कसा बदलतात?

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची केली गेलेली निवड चुकीचीच असल्याचे दिसून येते. नार्वेकरांना विधानसभेच्या बहुमतापेक्षा एक मत कमी पडले आहे. जर फुटीर आमदाराबाबबत निर्णय वेळीच झाला असता,तर नार्वेकर अध्यक्षपदी निवडून आले नसते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

तसेच, स्वत:ला शिवसेना असे म्हणून घेणाऱ्या आमदारांनी भाजपच्या अध्यक्षांना मत दिले कसे ?, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in