Eknath Shinde-Uddhav Thackeray News
Eknath Shinde-Uddhav Thackeray NewsSarkarnama

Shivsena Symbol Row : सिब्बलांनी केली शिंदे गटाची कोंडी; कागदपत्रे खरी असतील तर ओळख परेड करा...

Maharashtra Politics Crisis News : शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे

Election Commission on Shivsena : खरी शिवसेना (Shivsena) कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यानंतर आता शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी युक्तीवाद करत आहेत.

कपिल सिब्बल यांनी बाजू माडतांना म्हटले होते, ''त्यांनी शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. शिवसेनेतील हा फुटीर गट नाही. शिंदे गटाला काही अर्थ नाही. खरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचीच आहे. शिवसेनेत फूट हे कपोकल्पीत काल्पनिक बाब असल्याचे सिब्बल म्हणाले. शिंदे गट हे वास्तव नाही, शिवसेनेच्या घटनेचे आयोगात वाचन करण्यात आले. फूटलेल्या आमदारांनी स्वतःहून पक्ष सोडला,'' असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray News
ShivSena News : शिंदे गटाला काहीच अर्थ नाही; सिब्बलांचा मोठा दावा

शिंदे गटाच्या कागद पत्रांमध्ये अनेक त्रूटी आहेत. शिंदे गटाच्या याचीकेमध्ये अनेक त्रूटी आहेत, शिंदे गटाचे बंड पक्षाच्या आवस्थेवर परिनाम करणारे नाही. चिन्हावर निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करु नये, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने खोडून काढले. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा सिब्बल यांचा दावा. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नये. काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणे हे बेकायदेशीर, असल्याचेही सिब्बल म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्या. सर्व कागदपत्रांची छाननी करावी, असा युक्तीवाद सिब्बल यांच्या बाजूने सुरु आहे.

असा युक्तीवाद सिब्बल करत आहेत. ठाकरे गटाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित आहेत. तर शिंदे गटाच्या वतीने खासदार राहुल शेवाळेही उपस्थित आहेत. शिवसेनेती फूट ही फक्त कल्पना आहे, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगापुढे आता ठाकरे गटाच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाचा प्रतिवाद सुरू झाला आहे. वकील महेश जेठमलानी शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. 'आयोगाने धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नावाबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. आमच्याकडे संख्याबळ आहे. आमदार, खासदारांचे बहुमत जास्त असल्याने पक्षचिन्हाचा निर्णय लवकर घ्या, अशी मागणी जेठमलानी यांनी केली आहे.

तसेच लोकप्रतिनिधींसह एक मोठा गट पक्षातून बाहेर पडला तर तो बेकायदेशीर कसा, असा सवला त्यांनी उपस्थित केला. शिंदे गटाच्या कागदपत्रात त्रूटी नाही, ठाकरे गटाचा आरोप चुकीचा असे जेठमलानी यांनी म्हटले आहे. मोठ्या संख्येने पक्षातून लोकप्रतिनिधी बाहेर पडतात, यात तथ्य आहे.' असे त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray News
ShivSena News : शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने काढले खोडून...सिब्बल यांचा महत्त्वाचा युक्तीवाद

शिंदे गटाची कागदपत्रे खरी असतील तर ओळख परेड करा, असे सिब्बल म्हणाले आहे. आम्ही लाखो कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे पक्षावर आमचे वर्चस्व आहे. आयोगाने कादग पत्रांची छाननी करावी, आम्ही ती करायला तयार आहोत. शिंदे गटाचे आमदार, खासदार हे शिवसेना धनुष्यबाणावर निवडणू आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com