एलॉन मस्क बनले ट्विटरचे मालक अन् पराग अग्रवालांची चिंता वाढली!

टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटरची मालकी मिळवली आहे.
Parag Agrawal, Elon Musk
Parag Agrawal, Elon MuskSarkarnama

नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अखेर ट्विटरची मालकी मिळवली आहे. मस्क यांच्याकडून त्बबल 3 लाख 36 हजार 927 कोटी रुपयांमध्ये ट्विटर (Twitter) खरेदी केले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. पण या व्यवहारानंतर ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पराग अग्रवाल हे ट्विटरचे पहिले भारतीय सीईओ आहेत. मस्क हे ट्विटरचे मालक बनल्याने अग्रवाल यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मस्क हे अग्रवाल यांच्यासोबतचा करार पुढे कायम ठेवणार नाही, असं जाणकारांचं म्हणणं आहे. 'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, मस्क आणि ट्विटरमधला व्यवहार निश्चित झाल्यानंतर अग्रवाल यांनी टाऊनहॉलमध्ये बोलताना ट्विटरच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकता, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

Parag Agrawal, Elon Musk
औरंगाबादमध्ये जमावबंदी; राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता धूसर

अग्रवाल यांना द्यावे लागतील 321 कोटी रुपये

पराग अग्रवाल यांना ट्विटरमधून डच्चू देण्याच्या चर्चेत आता रिसर्च फर्म इक्विलरनुसार, अग्रवाल यांना बारा महिन्यांच्या आत काढून टाकल्यास ते मालामाल होतील. ट्विटरला त्यांना 321 कोटी रुपये द्यावे लागतील. त्यामुळे अग्रवाल यांना पदावरून हटवणं मस्क यांच्यासाठी तेवढं सोपं असणार नाही.

व्यवस्थापनात होणार बदल

एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यानंतर व्यवस्थापनात मंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच एक ट्विट करत सूचक संकेत दिले होते. मी जर ट्विटरची बोली जिंकली तर मंडळाचे वेतन शुन्य डॉलर असेल. त्यातून 30 लाख डॉलरची बचत होईल, असं मस्क म्हणाले होते.

मुक्त संवादावर मस्क यांचा भर

मस्क यांनी निवेदन जारी करताना मुक्त संवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मुक्त संवादाची आवश्यकता आहे. ट्विटचे अल्गोरिदमला ओपन सोर्स केले जाईल. त्यामुळे युझर्सचा विश्वास जिंकता येईल. ट्विटरजवळ खूप क्षमता आहे, असं मस्क यांनी म्हटलं आहे. तर ट्विटरकडून निवेदनात ही कंपनी आता मस्क यांच्या मालकीची खासगी कंपनी असेल, असं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com