मोठी बातमी : लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, ५ जवान शहीद

मोठी बातमी : लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, ५ जवान शहीद

मणिपूर (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये 46 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. (Terrorists Attack on Army Contingent in Manipur) या हल्ल्यात 46 आसाम रायफल्सचे कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासमवेत ५ जवान शहीद झाले आहेत. सोबत यात एका महिलेचा आणि एका अल्पवयीन मुलाचाही मृत्यू झाला आहे. हे अन्य दोघे जवानांच्या कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती मिळत आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या सेहकेन जिल्हा मुख्यालयाच्या चुराचांदपूर पासून जवळपास ६५ किलोमीटर लांब बेहियांग क्षेत्रातील म्यानमार सीमेवरील गावाजवळ ही घटना घडली आहे. शनिवार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी लक्ष ठेवून हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ट्विट करुन या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

हल्ल्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेसाठी ऑपरेशन सुरु केले आहे. या हल्ल्याच्या मागे, दहशतवादी संघटना पीपुल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ला जबाबदार मानले जात आहे. १९७८ साली बिश्वेसर सिंह यांनी या संघटनेची सुरुवात केली होती. पुढे जावून भारत सरकारने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. (PLA Attack in Manipur)स्वतंत्र मणिपूरच्या मागणीसाठी ही संघटना प्रामुख्याने ओळखली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com