काश्मीर सोडा नाहीतर मरायला तयार रहा! काश्मिरी पंडित, 'आरएसएस'ला आलेल्या धमकीनं खळबळ

लष्कर-ए-इस्लाम नावाच्या दहशतवादी संघटनेने ही धमकी दिली आहे.
Threat to kashmiri pandit Latest Marathi News
Threat to kashmiri pandit Latest Marathi NewsSarkarnama

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. काश्मीर सोडा नाहीतर मरायला तयार रहा, अशी धमकी लष्कर-ए-इस्लाम नावाच्या दहशतवादी संघटनेने दिली आहे. काही दिवसांपूर्वी राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. त्यानंतर ही धमकी आल्यानं सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. (Kashmiri Pandit Latest Marathi News)

काश्मीरमध्ये सरकारी सेवेत असलेल्या काश्मिरी पंडितांना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. पुलवामा येथील हवाल येथील स्थलांतरितांच्या कॉलनीच्या अध्यक्षांना पत्र पाठवून धमकावण्यात आलं आहे. या कॉलनीत राहणारे बहुतेक काश्मिरी पंडित सरकारी नोकरीमध्ये आहेत. (Terror group Lashkar-E-Islam issues fresh threat to Kashmiri Pandit)

Threat to kashmiri pandit Latest Marathi News
मेधा सोमय्या उचलणार मोठं पाऊल; राऊतांना आणणार जेरीस

दहशतवादी संघटनेने पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'सर्व स्थलांतरित आणि आरएसएस एजंट यांनी सोडून जावे, अन्यथा मरायला तयार रहा. काश्मीरमध्ये आणखी एक इस्त्राईल करून काश्मिरी मुस्लिमांची हत्या करण्याची इच्छा असलेल्या काश्मिरी पंडितांना इथे जागा नाही. तुमची सुरक्षा दुप्पट, तिप्पट करा, टारगेट किलींगला तयार रहा. तुम्ही मरणार,' असा थेट इशारा पत्रात देण्यात आला आहे.

दरम्यान, बडगाम येथील तहसील कार्यालयातील अधिकारी राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी कार्यालयात घुसून हत्या केली आहे. राहुल हे काश्मिरी पंडित होते. ते मागील काही वर्षांपासून महसूल विभागात कार्यरत होते. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी चोवीस तासांतच दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. पण त्यानंतर आलेल्या धमकीच्या पत्राने खळबळ उडाली आहे.

Threat to kashmiri pandit Latest Marathi News
काँग्रेसचं ठरलं! अखेर तिकीट वाटप अन् पदांबाबत घेतला मोठा निर्णय

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी राहुल यांच्या पत्नीला जम्मूमध्ये सरकारी नोकरी, कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासह मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याची घोषणा केली आहे. पण घटनेनंतर काश्मिरी पंडितांनी मागील आठवड्यात आंदोलन केले. यावरून काश्मीर खोऱ्यात चिंतेचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com