ऐकावं ते नवलच...आता कोरोनादेवी करणार महामारीतून सुटका!

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू भारतात होत आहेत.
temple in tamil nadu dedicate corona devi idol to protect people from pandemic
temple in tamil nadu dedicate corona devi idol to protect people from pandemic

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid19)  संसर्गाची दुसरी लाट आली आहे. जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू  (Covid Deaths) भारतात होत आहेत. या महामारीपासून (Pandemic) वाचण्यासाठी अनेकजण चित्रविचित्र प्रकार करू लागले आहेत. असाच प्रकार तमिळनाडूत घडला आहे. तमिळनाडूत चक्क कोरोनादेवीची (CoronaDevi) मूर्ती एका मंदिरात स्थापन करण्यात आली आहे. ही देवी महामारी दूर करेल, असा विश्वास तेथील भाविक व्यक्त करीत आहेत. 

कोरोना महामारीत संपूर्ण देश होरपळत आहे. यातून लवकरात लवकर सुटका व्हावी, अशी प्रार्थना नागरिक मनोमन करीत आहेत. तमिळनाडूतील कोईमतूरनजीक एक मंदिरात मात्र, वेगळाच प्रकार सुरू झाला आहे. या मंदिरात कोरोनादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हे मंदिर कामाचीपूरम या गावात आहे. ग्रॅनाईटपासून बनवलेली दीड फूट उंचीची कोरोनादेवीची मूर्ती या मंदिरात बसवण्यात आली आहे.   

मंदिरात या मूर्तीची विशेष पूजा करण्यात येत आहे. ही विशेष पूजा पुढील 48 दिवस अव्याहतपणे सुरू राहणार आहे. परंतु, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मंदिर भाविकांसाठी खुले असणार नाही. ही पूजा पूर्ण झाल्यानंतर आपण कोरोना महामारीतून मुक्त होऊ, असा विश्वास मंदिराच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे. या अजब प्रकाराची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

देशात 24 तासांत 4 हजार 209 जणांचा मृत्यू 
देशात मागील 24 तासांत 2 लाख 59 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 209 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेल्या रुग्णांची संख्या साडेतीन लाख आहे.  देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 91 हजार 331 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

ग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर प्रथमच 17 मेपासून रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच वेगाने रुग्णसंख्येत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचे सूर सरकारमधून व्यक्त होत आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 30 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 30 लाख 27 हजार 925 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 11.63 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.25 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 27 लाख 12 हजार 735 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com