Telangana News : तेलंगणात सर्वत्र 'कमळ' फुलत आहे : मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर मोदींचा वार!

Telangana News : तेलंगणातील जनतेने ज्या पक्षावर सर्वाधिक विश्वास ठेवला, त्यांनीच विश्वासघात केला आहे.
Kcr
KcrSarkarnama

Telangana News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेलंगणासाठी अनेक घोषणा केल्या. यासोबतच त्यांनी इशारा देत आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या इराद्यांची झलक दाखवली. आगामी काळात तेलंगणात सर्वत्र कमळ फुलणार', असेही मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता तेलंगणातील मुनुगोडे विधानसभेच्या पोटनिवडणुकीचाही उल्लेख केला.

काय म्हणाले पीएम मोदी ?

टीआरएसचे नाव न घेता हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, तेलंगणातील जनतेने ज्या पक्षावर सर्वाधिक विश्वास ठेवला, त्या पक्षानेच तेलंगणाचा विश्वासघात केला आहे. अंधार खूप वाढला की आपल्याही आजूबाजूला दाट अंधार वाढत जातो, अशा स्थितीत 'कमळ' फुलू लागते. पहाट होण्याच्या आधी, आज तेलंगणामध्ये मला कमळ फुलताना दिसत आहे. तेलंगणातील अंधार दूर होताना मला दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर मोदी यांनी टीआरएसवर निशाणा साधला. भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण तेलंगणा सरकार एका विधानसभा मतदारसंघात आणले आहे. मात्र जनतेचा आशीर्वाद भाजपसोबत असल्याचे मोदी म्हणाले.

मागील दोन वर्षात दुबाक आणि हुजुराबाद विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा दाखला देत मोदी म्हणाले, "अलीकडच्या काळात ज्या काही पोटनिवडणुका झाल्या, त्यातून तेलंगणाचा सूर्योदय फार दूर नाही, असा संदेश स्पष्ट होतो." अंधार नाहीसा होईल. तेलंगणात सर्वत्र कमळ फुलणार आहे. माहिती तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, तेलंगणाचा विकास करायचा असेल तर अंधश्रद्धेपासून दूर राहावे लागेल.

Kcr
Devendra Fadnavis : ठाकरे सरकारच्या काळात गेलेले प्रकल्प आमच्या नावाने दाखवणे बंद करा!

मुनुगोडे जागेचा निकाल काय ?

तेलंगणातील मुनुगोडे जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल 6 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपचे के राजगोपाल रेड्डी, टीआरएसचे के प्रभाकर रेड्डी आणि काँग्रेसच्या पलावाई श्रवंती रिंगणात होत्या. निकाल जाहीर झाला तेव्हा टीआरएस उमेदवार 10,000 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाला होता. काँग्रेसने ही जागा गमावली आहे.

Kcr
Police Transfers : ठाकरे सरकारने साईड पोस्टिंगवर पाठवलेल्या अधिकाऱ्यांना फडणवीसांनी पुन्हा मुंबई आणले..

पराभूत होऊनही भाजप कसा जिंकला?

मुनुगोडे पोटनिवडणूक भाजपसाठी चांगले संकेत घेऊन येत असल्याचे दिसत आहे. येथे काँग्रेसचे आमदार असलेले राजगोपाल रेड्डी यांना पक्षात आणून भाजपने काँग्रेसला धक्का दिला. एवढेच नाही तर काँग्रेसकडे असलेल्या जागेवर काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. याशिवाय या निवडणुकीसह भाजपनेही आपली ताकद टीआरएससमोर मांडली.

येथे पोटनिवडणुकीचे वातावरण तापू लागल्याने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला होता. मुख्यमंत्री केसीआर आणि संपूर्ण मंत्रिमंडळ या जागेसाठी प्रचारात सहभागी होताना दिसत होते. यातूनही भाजपने आक्रमक प्रचाराचा केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com