तेलगणांच्या राज्यमंत्र्याची विधानसभेत लष्करी अधिकाऱ्यांना धमकी

सिंकदराबाद येथील छावणी परिसरातील २१ रस्ते बंद करुन त्यांचा समावेश लष्कर परिसरात करण्यात आला आहे.
KTR
KTRsarkarnama

सिंकदराबाद (तेलंगणा) : तेलगणांचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR)सरकारने लष्करांच्या अधिकाऱ्यांनी धमकी दिली आहे. 'केसीआर' याचे पुत्र आणि राज्य सरकारचे मंत्री केटी रामारावा (KTR)यांनी सिंकदराबाद येथील छावणी परिसरात राहणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची वीज आणि नळजोड तोडण्याची धमकी विधानसभेत दिल्याचे गोंधळ उडाला आहे.

तेलगंणा राष्ट्र समिती (TRS)चे कार्यकारी अध्यक्ष केटीआर विधानसभेत म्हणाले, ''आवश्यकता पडल्यास आम्ही लष्करी अधिकाऱ्यांची वीज आणि नळजोड तोडून टाकू. कारण हे लष्करी अधिकारी कधीही रस्ते बंद करतात, हे चुकीचे आहे,''

सिंकदराबाद येथील छावणी परिसरातील २१ रस्ते बंद करुन त्यांचा समावेश लष्कर परिसरात करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना त्यांचा त्रास होत आहे, असा दावा केटीआर यांनी केला आहे. स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी रस्ते बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. या परिसरात सकाळी फिरण्यासही लष्कराने येथील नागरिकांनी मनाई केली आहे.

''लष्काराने बल्कापूर नाल्यावर तपासणी केंद्र केल्याने नदीम कॅालनी परिसरात पाणी साचले आहे. ऑर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (ASI)हे गोलकुंडा किल्ले येथे काम करण्यास राज्य सरकारला परवानगी देत नाही. यामुळे सरकार शतम टॅंकपासून गोलकुंडा किल्ला येथे पाणी सोडू शकत नाही. आम्ही या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितले की आम्हाला येथे काम करु द्या, पण त्यांनी त्याला परवानगी दिली नाही, त्यामुळे आम्हाला त्यांचे पाणी आणि नळजोड तोडावे लागतील,'' असे केटीआर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com