मला बिर्याणीत लेग पीस नाय मिळाला...थेट मंत्र्यांकडे केली तक्रार अन् मिळालं उत्तरही!

सोशल मीडियाच्या जमान्यात कोण कशाची तक्रार कुणाकडे करेल याचा ताळमेळ लागत नाही. असाच एक मजेशीर प्रकार आता समोर आला आहे.
telangana man complaints to minister about missing leg piece of biryani
telangana man complaints to minister about missing leg piece of biryani

हैदराबाद : सोशल मीडियाच्या (Social Media) जमान्यात कोण कशाची तक्रार कुणाकडे करेल याचा पत्ताही लागत आहे. असाच एक मजेशीर प्रकार आता समोर आला आहे. एका व्यक्तीने झोमॅटोवरुन (Zomato) बिर्याणीची (Biryani) ऑर्डर दिली. पण बिर्याणीत त्याला लेग पीसच (Leg Piece) मिळाला नाही. यामुळे संतापून त्याने ट्विट करीत झोमॅटोसह एक मंत्र्यांकडे दाद मागितली. याला मंत्रिमहोदयांनी उत्तर दिले असून, ते व्हायरल झाले आहे. 

तेलंगणमध्ये हा प्रकार घडला आहे. राज्याचे महापालिका प्रशासन व नागरी विकास मंत्री के.टी.रामा राव (KTR) यांच्याबाबत ही घटना घडली आहे. केटीआर हे ट्विटरवर सतत सक्रिय असतात. अनेक नागरिकांच्या त्यांच्याकडे ट्विटरवर तक्रारी करीत असतात. ते या तक्रारी तातडीने सोडवतात. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे ते पुत्र आहेत. अनेक वेळा सोशल मीडियावरुन नागरिक त्यांच्याकडे मदत मागतात. ते सरकारी अधिकाऱ्यांना सूचना करुन मदत पोचवतात. 

आता मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. थोटाकुरी रघुपती या व्यक्तीने झोमॅटोवरुन बिर्याणी मागवली होती. त्याने बिर्याणी मागवताना त्यासोबत एक्स्ट्रा मसाला आणि लेग पीसही मागवला होता. परंतु, त्याला मसाला आणि लेग पीस मिळाला नाही. त्यामुळे त्याने दाद मागण्याचे ठरवले. त्याने ट्विट केले आणि यात झोमॅटो आणि केटीआर यांना टॅग केले. त्याने ट्विटमध्ये म्हटले होते की, मी चिकन बिर्याणीसह एक्स्ट्रा मसाला आणि लेग पीस मागवला होता. परंतु, मला बिर्याणीसोबत ते मिळालं नाही. अशा प्रकारे तुम्ही जनतेला जेवण देता का? 

या ट्विटला केटीआर यांनीही उत्तर दिले. भावा, मला या ट्विटमध्ये का टॅग केले आहेस? मी यात काय करणे अपेक्षित आहे, असे उत्तर त्यांनी दिले. यानंतर हे ट्विट व्हायरल झाले. यामुळे तक्रार करणाऱ्या व्यक्तीने त्याचे ट्विट तातडीने डिलिट केले. परंतु, त्या ट्विटचा स्क्रीनशॉटही आधीच व्हायरल झाला होता. यावरुन सोशल मीडियावर ट्रेंडही सुरू झाला होता. अनेकांनी हैदराबादमधील लोक त्यांच्या बिर्याणीला फार गंभीरपणे घेतात, असा सूर आळवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in