Telangana Politics| महाराष्ट्रानंतर तेलंगाणा सरकार पडणार? सत्तांतराच्या हालचालींना वेग...

Telangana Political Crises| नोव्हेंबर २०२३ मध्ये तेलंगाणात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
Telangana Political Crises|
Telangana Political Crises|

हैदराबाद : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर आता दक्षिणेकडील तेलंगाणा राज्यातही सध्या राजकीय घडामोडीना वेग आला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये तेलंगाणात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आतापर्यंत भाजपाला (BJP) कर्नाटक वगळता दक्षिणेकडील कोणत्याही राज्यात आपली सत्ता प्रस्थापित करता आलेली नाही. त्यामुळे तिथे भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.

तेलंगाणातील भाजपेचे खासदार बंडी संजय कुमार यांच्या एका वक्तव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जवाहर नगरमधील कचऱ्याच्या समस्येवरून बंडी संजय कुमार यांनी राज्यसरकारवर निशाणा साधत एक सूचक वक्तव्य केलं आहे. “तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे, लवकरच ते कोसळणार आहे, असं संजय यांनी म्हटलं आहे. तसेच, कचरा डेपोमुळे जनतेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. मेडचल येथील जनतेच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी भाजप घेईल, अशी ग्वाही संजय कुमार यांनी दिली आहे.

Telangana Political Crises|
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी होणार 'लाईव्ह'

“ मुख्यंत्री के चंद्रशेखर राव यांनी मेडचल येथील कचरा डेपो गहाण ठेवला आहे. तिथे शॉपिंग मॉल्स बांधले जात आहेत. पण टीआरएसच्या नेत्यांना त्याच कचऱ्याचा डेपोत बांधा आणि भाजपच्या हाती सत्ता द्या मग हा कचऱ्याचा प्रश्न कसा सुटत नाही ते पाहू, अशी टीकाही त्यांनी त्यांनी केली आहे.

“मुख्यमंत्री चंद्रशेखर राव कुटूंबियांसाठी ईडी म्हणजे कोरोना आणि सीबीआय म्हणजे पायाचे दुखणे आहे,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. बोदुप्पल येथील जमिनी हडपण्याचे काम सुरू आहे. इथे ना १०० खाटांचे रुग्णालय आहे ना कोणतेही महाविद्यालय. राज्यसरकार केंद्र सरकारचा निधी दूसरीकडे वळवत आहे. कमिशनसाठी ट्रॅक्टर खरेदी करुन त्यामाध्यमातून शेकडो कोटींची मालमत्ता कमावली जात असल्याचा आरोप संजय कुमार यांनी तेलंगणा सरकारवर केला आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे केंद्रातील भाजप सोबत चांगले संबंध होते. पुरेसे संख्याबळ नसल्याने तेलंगणा राष्ट्र समिती राज्यसभेत भाजपाला अनुकूल अशी भूमिका घेत असे. पण तेलंगणात हातपाय पसरायला संधी दिसू लागताच भाजपने चंद्रशेखर राव यांचेही पंख छाटण्यास सुरुवात केली. भाजपने मागील हंगामात उत्पादित सर्व तांदूळ खरेदी करण्यास नकार दिला. हा तेलंगणा राष्ट्र समितीला पहिला धक्का होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in