नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा ठेंगा दाखवत मुख्यमंत्री पोहचले माजी पंतप्रधानांच्या भेटीला

Narendra Modi | KCR : तिसऱ्या आघाडीची तयारी जोरात...
Chief Minister K. Chandrashekar Rao met former Prime Minister HD Devegowda and former Chief Minister of Karnataka HD Kumaraswamy in Bangalore today.
Chief Minister K. Chandrashekar Rao met former Prime Minister HD Devegowda and former Chief Minister of Karnataka HD Kumaraswamy in Bangalore today.Twitter

बंगळुरू : तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी आज माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (former Prime Minister HD Deve Gowda) यांची बंगळुरुमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. (HD Kumaraswamy) कुमारस्वामी देखील उपस्थित होते. आगामी प्रस्तावित तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर के. चंद्रशेखर राव यांची ही भेट अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. (K Chandrashekar Rao latest News)

यावेळी के. चंद्रशेखर राव म्हणाले, आम्ही राष्ट्रीय आणि कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. आज देशाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्य जनता, आदिवासी यांपैकी देशात कोणीही आनंदी नाही. अनेक आश्वासन दिली जातात, पण उद्योग बंद होत आहेत, महागाई वाढत आहे. इतिहासात पहिल्यांदाच रुपायाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे, ही सत्य परिस्थिती आहे.

आपल्यापेक्षा कमी जीडीपी असलेल्या चीनची १६ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनली आहे, आणि आपण ५ ट्रिलीयन डॉलरची स्वप्न बघतं आहे. पण देशात जर मन लावून काम केले तर आपली अमेरिकेपेक्षा मोठी अर्थव्यवस्था बनु शकते, असेही राव म्हणाले. तर एचडी कुमारस्वामी म्हणाले, के चंद्रशेखर राव हे मागील काही काळापासून तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या राज्यात जावून अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यांना आपला देश वाचवायचा आहे आणि यात बदल आणायचे आहेत.

पंतप्रधान मोदींना दुसऱ्यांदा दाखविला ठेंगा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर असतानाच के. चंद्रशेखर राव हे त्यांची भेट टाळून बंगळुरुमध्ये पोहचले आहेत. यातही त्यांनी देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्या घेतलेल्या भेटीमुळे अधिक चर्चा रंगली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये देखील के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट टाळली होती. त्यावेळी त्यांनी तब्येत अस्वस्थतेचे कारण सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com