तेजस्वी यादव अडचणीत? सीबीआयने उचलले मोठे पाऊल

Tejasvi Yadav : तेजस्वी यादव यांनी उघडपणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप
Tejasvi Yadav
Tejasvi YadavSarkarnama

बिहार : आयआरसीटीसी (IRCTC) घोटाळ्याप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) यांचा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने न्यायालयात धाव घेतली आहे. यादव यांचा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. राऊज एव्हेन्यू येथील विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्या न्यायालयाने सीबीआयच्या याचिकेवर तेजस्वी यादव यांना नोटीस बजावली आहे. यामुळे आता जामीन रद्द होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Latest Marathi News)

तेजस्वी यादव तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे, असे सीबीआयने म्हंटले आहे. सीबीआयच्या याचिकेचा विचार करून जामीन का रद्द करू नये, अशी विचारणा न्यायालयाने तेजस्वी यादव यांना केली. मात्र, आता न्यायालयाने यादव यांना उत्तर देण्यासाठी समन्स बजावले. आयआरसीटीसी घोटाळ्यात तेजस्वी यादव सध्या जामिनावर बाहेर आहेत.

तेजस्वी यादव हे आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपी आहेत. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासावर प्रभाव टाकणे ही गंभीर बाब असल्याचा युक्तिवाद सीबीआयने न्यायालयात मांडला. यादव यांच्याकडून या प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, यामुळे या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकेल. तेजस्वी यादव यांचे बाहेर असणे, खटल्यातील अनेक साक्षीदारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही सीबीआयने याचिकेत म्हंटले आहे.

Tejasvi Yadav
'वेदांत'मध्ये 'डील'? उदय सामंतांचा आरोप, चौकशीचा इशारा

या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यासह अनेक जण आरोपी आहेत. हे प्रकरण राऊज अॅव्हेन्यू कोर्टात सुरू आहे. सीबीआयसोबतच ईडीही या प्रकरणाचा तपास करत आहे. आयआरसीटीसी हॉटेल टेंडरमध्ये गैरव्यवहार उघडकीस आले होते, लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबीयांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातून जामीन मिळाला होता, परंतु आता सीबीआयने म्हंटले की, तेजस्वी यादव प्रभावी पदावर आहेत आणि या प्रकरणात हस्तक्षेप करून तपासावर प्रभाव पाडत आहेत. .

Tejasvi Yadav
Ajit Pawar : आम्ही सत्तेत असतो तर वेदांता प्रकल्प गुजरातला जावू दिला नसता..

सीबीआयने याचिकेत नमूद केले की, यादव यांनी पत्रकार परिषदेत उघडपणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली, ते आता प्रभावी पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या धमकीचा आणि इतर बाबींचा या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ शकतो. बिहारमध्ये अनेक ठिकाणी सीबीआयच्या छाप्यांसंदर्भात यादव यांनी पत्रकार परिषद घेतल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in