कोरोनाची पहिली लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच घ्यावी..!

केंद्र सरकारने कोरोनालशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
tej pratap yadav says pm narendra modi should take first shot of covid 19 vaccine
tej pratap yadav says pm narendra modi should take first shot of covid 19 vaccine

नवी दिल्ली : ऑक्सफोर्डच्या सहाय्याने सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली कोविशिल्ड व भारत बायोटेक बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींच्या मर्यादित वापराला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भारत बायोटेकच्या कोरोना लशीला योग्य चाचण्या पूर्ण करण्याआधीच परवानगी दिल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावरुन विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केले असून, पहिली लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच घ्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे. 

पुण्यात ऑक्सफोर्डच्या सहाय्याने सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली कोविशिल्ड व भारत बायोटेक बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींच्या मर्यादित वापराला परवानगी देण्यात येत असल्याचे औषध नियंत्रण महासंचालक व्ही. जी. सोमाणी यांनी जाहीर केले होते. या दोन्ही कंपन्यांनी आमच्याकडे चाचण्यांचे निष्कर्ष सादर केले आहेत. या दोन्ही लशी शंभर टक्के सुरक्षित असून थोडीही शंका असती तर आम्ही त्यांच्या वापराला परवानगी दिली नसती, असेही सोमाणी यांनी स्पष्ट केले होते. 

भारत बायोटेकच्या कोरोना लशीला सर्व चाचण्या पूर्ण करण्याआधीच वापराची परवानगी दिल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजप्रताप यादव यांनी पंतप्रधान मोदींना थेट आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाची लस सर्वांत प्रथम नरेंद्र मोदी यांनी घ्यावी. त्यांनी आधी लस घेतल्यानंतर आम्हीही ती घेऊ. 

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या लशीवर अविश्वास दाखवला होता. भाजपच्या लशीवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्याच पक्षाचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी तर या लशीमुळे नपुंसक बनवले जाऊ शकते, असा दावा करुन खळबळ उडवून दिली आहे. 

काँग्रेस नेते आनंद शर्मा, शशि थरूर आणि जयराम रमेश यांनीही या प्रकरणी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. गृह मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीचे सदस्य असलेल्या आनंद शर्मा यांनी या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यावरुन सरकारला सावधगिरीचा इशारा दिला होता. 

जयराम रमेश यांनी म्हटले होते की,  भारत बायोटेक ही आघाडीची कंपनी असली तरी तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य असलेले तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकष बदलले आहेत. हे गोंधळात टाकणारे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीच आता याविषयी स्पष्टीकरण द्यावे. 

काँग्रेस नेते शशि थरूर यांनी म्हटले होते की, भारतीय लशीला मान्यता मिळत असेल तर माझ्यासाठी ती अभिमानाची बाब आहे. परंतु, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतून ती सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे सिद्ध व्हायला हवे. योग्य प्रक्रिया टाळून लशीला परवानगी देणे हे धोक्याचे आहे. यातून अनेक जणांचे जीव आपण धोक्यात घालत आहोत. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com