बिहारमध्ये वादळ : यादव कुटुंबात फूट...तेजप्रताप यादव पक्षातून बाहेर

तेजस्वी यादव व तेजप्रताप यादव यांचीतील वाद शिगेला पोहचला आहे.
बिहारमध्ये वादळ : यादव कुटुंबात फूट...तेजप्रताप यादव पक्षातून बाहेर
Tejaswi Yadav & Tej Pratap Yadav.

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालुप्रसाद यादव यांच्या कुटुंबात उभी फूट पडली आहे. त्यांचे पुत्र तेजस्वी यादव व तेजप्रताप यादव यांचीतील वाद शिगेला पोहचला आहे. या वादातून तेजप्रताप यादव यांनी वेगळी संघटना स्थापन केली आहे. त्यातच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तेजप्रताप यादव हे पक्षातून बाहेर पडल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांना पक्षाचं चिन्ह वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय वादळ उठलं आहे.

बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल तेजस्वी यादव व आमदार तेजप्रताप यादव यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहे. पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ असल्याचे समजते. लालुप्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांच्याकडेच पक्षाची धुरा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यावरून तेजप्रताप नाराज आहेत. यापार्श्वभूमीवर हाजीपूर येथे बोलताना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी ही माहिती दिली आहे.

Tejaswi Yadav & Tej Pratap Yadav.
शरद पवारांनी सांगितली आठवण...म्हणाले संरक्षणमंत्री झाल्यावर थेट कोल्हापूर गाठले!

तिवारी म्हणाले, तेजप्रताप यांना पक्षातून निलंबित करण्याचा प्रश्नच नाही. ते स्वत:हून पक्षातून दूर केले आहेत. त्यांनी स्वत:ची संघटना तयार केली आहे. पक्षाचे कंदील हे चिन्ह वापरण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे. त्यांच्या संघटनेसाठी कंदील हे चिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आल्याचे तेजप्रताप हेही सांगत आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा प्रश्नच नाही. ते पक्षात नसून स्वत:हून बाहेर पडले आहेत, असं तिवारी यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, तिवारी हे लालुप्रसाद यांचे अत्यंत जवळचे नेते मानले जातात. त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हे लक्षात येतात त्यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तेजप्रताप हे पक्षात आहेत की नाही, हे सांगणारा मी कोण? मी वेगळ्या अर्थाने ते पक्षात नसल्याचे म्हटले होते. त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. पण त्यांच्या या वक्तव्यावरून यादव कुटुंबात फूट पडल्याचे स्पष्ट झालं आहे.

भाजपचे राज्य प्रवक्त निखील आनंद यांनी या वादात उडी घतेली आहे. ते म्हणाले, तिवारी यांच्या वक्तव्यावरून यादव बंधूंमध्ये वाद असल्याचे उघड झाले असून तेजस्वी यांच्या बंधूंना बाजूला काढल्याचे दिसते. पक्षाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी हे केले आहे. आरजेडी हे लोकशाही मानणारा पक्ष नसून केवळ कुटुंबाचे नियम लागू केले जात असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.