धक्कादायक : दिवंगत माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या मुलीची आत्महत्या; राहत्या घरी गळफास

NTR | TDP : पोलिसांकडून गुन्हा दाखल...
NTR | TDP | Uma Maheshwari
NTR | TDP | Uma Maheshwari Sarkarnama

हैदराबाद : तेलगु देसम पक्षाचे (TDP) संस्थापक आणि आंध्र-प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटीआर अर्थात एनटी रामा राव (NTR) यांची मुलगी उमा माहेश्वरी या मृतावस्थेमध्ये आढळून आल्या आहेत. त्यांनी हैदराबादमधील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी उमा माहेश्वरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. तसेच पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम १७४ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, उमा माहेश्वरी या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. याच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आलेल्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असावी असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. (TDP founder & ex-CM NT Rama Rao's daughter, Uma Maheshwari found hanging at her residence in Hyderabad)

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दग्गुबती पुरंदेश्वरी आणि तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी माहेश्वरी यांच्या बहिणी आहेत. घटनेची माहिती मिळताच नायडू, त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी माहेश्वरी यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

उमा माहेश्वरी या तेलुगु देसम पक्षाचे संस्थापक एनटीआर यांच्या चार मुलींमध्ये त्या सर्वात लहान होत्या. एनटीआर हे दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. त्यांनी १९८२ मध्ये तेलुगू स्वाभिमानाचा नारा देत तेलगु देसमची स्थापना केली. स्थापनेनंतर अवघ्या नऊ महिन्यांतच त्यांनी पक्षाला सत्तेवर आणले होते. मात्र पुढे त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली पक्षात मोठे बंड झाले आणि त्यांनी संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला. त्यामुळे एनटीआर सत्तेतून बाहेर फेकले गेले. त्यानंतर काही महिन्यांनी १९९६ मध्ये वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com