आता सहन होत नाही, असं म्हणत चंद्राबाबू नायडू ढसाढसा रडू लागले! (व्हिडीओ)

व्यक्तिगत टीकेमुळे व्यथित झालेल्या चंद्राबाबू नायडूंना भावनांचा बांध आवरता आला नाही.
Chandrababu Naidu
Chandrababu NaiduSarkarnama

अमरावती (आंध्र प्रदेश) : तेलगू देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे आज भावूक झाले. पत्रकार परिषद सुरू असतानाच ते ढसाढसा रडू लागले. विधानसभेत वायएसआर काँग्रेसच्या (YSR Congress) सदस्यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेमुळे व्यथित झालेल्या नायडूंना भावनांचा बांध आवरता आला नाही. दरम्यान, पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत विधानसभेत पाऊल टाकणार नाही, अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली आहे.

विधानसभेत आज सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष टीडीपीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कृषी क्षेत्रावरील चर्चेवेळी हे रणकंदन झाले. नायडू यांच्या पत्नीबाबत वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी अपशब्द वापरले. नायडू हे बोलत असतानाच त्यांचा माईक बंद करण्यात आला. अखेर अपमान सहन न झाल्याने नायडूंनी मुख्यमंत्री होईपर्यंत विधानसभेत पुन्हा पाऊल न टाकण्याची प्रतिज्ञा केली.

Chandrababu Naidu
राहुल गांधींनी वर्तवलेलं भाकित अखेर खरं ठरलं!

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नायडूंना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, आता सहन होत नाही. मागील अडीच वर्षे मी सगळे काही सहन करीत होतो परंतु, मी शांत होतो. आज त्यांनी माझ्या पत्नीलाच लक्ष्य केले. मी कायम सन्मानाने जगलो असून, सन्मानासाठी जगलो आहे. आता हे सहन करण्यापलिकडे गेले आहे.

Chandrababu Naidu
पर्रीकरांच्या मुलाने तिकिट मागितलं अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

वायएसआर काँग्रेसने मात्र नायडू हे नाटक करीत असल्याची टीका केली आहे. याच आठवड्यात नायडू यांना त्यांच्या चित्तूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला होता. जिल्ह्यातील कूप्पम महापालिकेत पहिल्यांदाच टीडीपीचा पराभव झाला आहे. वायएसआर काँग्रेसने 25 पैकी 19 वॉर्ड जिंकले होते. याचबरोबर राज्यात आधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही नायडूंना मोठा फटका बसला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com