Tamilnadu Politics : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन कुटुंबाकडे तब्बल 1.34 लाख कोटींची मालमत्ता?; यंत्रणांची पडणार वक्र नजर !

Tamilnadu Politics : केंद्रीय यंत्रणांचा मोर्चा आता दक्षिणेतील राज्यांकडे?
Tamilnadu Politics : Staline
Tamilnadu Politics : StalineSarkarnama

Tamil Nadu Chief Minister Stalin family : तामिळनाडू राज्याचे भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी आज वेगळी माहिती माध्यमांसमोर सादर केली. 1.34 लाख कोटी रुपये इतक्या मालमत्तेची एक लांबलचक यादी यावेळी त्यांनी सार्वजनिक केली. या यादीला 'डीएमके फाइल्स' असे त्यांनी नाव दिले आहे.

डीएमके (DMK) फाईल्स सादर करताना, अन्नामलाई यांनी दावा केला होता की, ही सर्व संपत्ती तामिळनाडू मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडूचे (TamilNadu) क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबतच, द्रमुकचे पक्षाचे नेते दुराई मुरुगन, ईव्ही वेलू, के पोनमुडी, व्ही सेंथिल बालाजी आणि माजी केंद्रीय मंत्री एस जगथरक्षकन यांच्या मालकीची आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता.

Tamilnadu Politics : Staline
Delhi excise policy case : केजरीवालांना कधी आणि कुठे अटक होणार?, आपच्या नेत्याच्या मोठा दावा!

भाजपचे अण्णामलाई यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ते म्हणाले, "2011 च्या दरम्यान राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी द्रमुक पक्ष सत्तेत होता. चेन्नई शहरातील मेट्रो रेल्वेचं काँन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी संबंधित कंपनीला तब्बल 200 कोटी रूपये लाच स्वरूपात देण्यात आली. शेल कंपन्यांच्या मार्फत ही देयके हस्तांतरीत करण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच या संबंधित कंपनीची या लाचखोरीच्या प्रकरणी अमेरिकेत चौकशी करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.

मालमत्तेचे मूल्य ठरवण्याच्या मोजमाप पद्धती वापरल्या स्पष्टीकरण देताना, अण्णामलाई यांच्याकडून द्रमुक पक्षाच्या नेत्यांना, त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये जाहीर केलेल्या मालमत्तांचा हवाला दिला होता.

Tamilnadu Politics : Staline
Delhi excise policy case : केजरीवालांना कधी आणि कुठे अटक होणार?, आपच्या नेत्याच्या मोठा दावा!

महाराष्ट्रातही भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अशाच प्रकारे किरीट सोमय्या वारंवार विरोधी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. सोमय्यांनी यावेळी आरोप केलेले नेते तुरूंगात घातले होते. मात्र आता अण्णामलाई यांच्या आरोपांमुळे तामिळनाडूचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in