राजीव गांधी हत्येतील आरोपीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गळाभेट ; गांधी परिवाराचे मौन

राजीव गांधी यांची हत्या ज्या बॉम्बस्फोटात झाली तो बॉम्ब बनवण्यामध्ये ९ वोल्टच्या दोन बॅटरीज वापरण्यात आल्या होत्या ज्या पुरवण्याचा आरोप या पेरीवलान यावर होता.
ag perarivalan, mk stalin
ag perarivalan, mk stalinsarkarnama

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi)हत्या खटल्यातील आरोपी असलेला एजी पेरीवलान (perarivalan) याची सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच सुटका केली आहे. कारागृहातून सुटका होताच एजी पेरीवलान याने थेट तमिलनाडुचे मुख्यमंत्री एमके स्टालिन (mk stalin) यांची भेट घेतली. मुख्यमंत्री स्टालिन यांनीही त्याची गळाभेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. (Rajiv Gandhi news update)

राजीव गांधी यांची हत्या ज्या बॉम्बस्फोटात झाली तो बॉम्ब बनवण्यामध्ये ९ वोल्टच्या दोन बॅटरीज वापरण्यात आल्या होत्या ज्या पुरवण्याचा आरोप या पेरीवलान यावर होता. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर २० दिवसांनी त्याला अटक करण्यात आली होती.

कलम १४२ नुसार न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पेरीवलान यांची नुकतीच सुटका केली. तब्बल ३१ वर्षे हा खटला सुरु होता."तब्बल ३१ वर्षे चाललेला माझ्या आईचा संघर्ष आता संपलाय," अशी प्रतिक्रिया पेरिवलन याने या न्यायालयाच्या निकालानंतर दिली आहे.

पेरीवलान याच्या भेटीच्या व्हिडिओ खुद्द स्टालिन यांनी शेअर केला, टि्वट केलं. यात त्यांनी पेरीवलान याचा उल्लेख 'भाई'असा केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्टालिन यांनी कौतुक केलं आहे. पेरीवलान याला त्यांच्या आईसोबत उत्तम भविष्य असल्याचे स्टालिन यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. तामिळनाडूमध्ये सध्या डीएमके आणि काँग्रेस यांची युती आहे.

एजी पेरीवलान याच्या सुटकेला विरोध करीत तामिळनाडू काँग्रेसने एक दिवसाचे मौन पाळून त्याचा निषेध केला. पण गांधी परिवारातील एका व्यक्तीही त्यांच्या सुटकेवर प्रतिक्रिया दिली नाही, त्याला विरोध केला नाही. राजीव गांधी यांच्या हत्येतील आरोपी पेरीवलान याच्या सुटकेवर राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी यावर बोलणं टाळलं.

ag perarivalan, mk stalin
सेटलमेंट करुन राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना शहाणपणा शिकवू नये !

तामिळनाडूमधील श्रीपेरांम्बदूर येथे राजीव गांधी यांची  २१ मे १९९१ रोजी तामिळ दहशतवादी संघटना एलटीटीईकडून हत्या करण्यात आली होती. या वेळी मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधी यांची हत्या झाली होती.

ag perarivalan, mk stalin
'हिंदूत्व' वॉशिंग पावडर आहे का ? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

या हत्येमागे एलटीटीईचा प्रमुख असलेल्या प्रभाकरन याचा हात होता. याच खटल्यातील अनेक आरोपींपैकी पेरीवलान हा एक होता. पहिले त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्याचे रूपांतर मग ५० वर्षांच्या जन्मठेपेत झाले. आता १८ मे २०२२ रोजी त्याची सर्वोच्च न्यायालयाकडून सुटका करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com