Narendra Modi : केजरीवालांच्या शिलेदारासाठी 'हे' मुख्यमंत्री मैदानात; पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणाले...

Manish Sisodia Arrestred : मनीष सिसोदिया यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे समजल्यापासून मी निराश झालो आहे.
Pm Narendra Modi
Pm Narendra Modi Sarkarnama

Tamilnadu Chief Minister M. K. Stalin Letter to Narendra Modi : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया यांना अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी सीबाआयने अटक केली आहे. या अटकेनंतर दिल्लीसह संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, आता या कारवाईवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षातील नऊ प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्यानंतर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हेही अरविंद केजरीवाल यांच्या शिलेदारासाठी मैदानात उतरले आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन(M. K. Stalin) यांनी मंगळवारी(दि.७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे स्टॅलिन यांनी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या बिनशर्त सुटकेची मागणी केली आहे. आता या पत्राची पंतप्रधान मोदी दखल घेतात का आणि सिसोदिया यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Pm Narendra Modi
Rasane Vs Dhangekar : ''पेटेन उद्या मी नव्याने...'' ; भाजपच्या रासनेंकडून 2024 ची तयारी सुरु,कसब्यात बॅनरबाजी

स्टॅलिन पत्रात नेमकं काय म्हणाले?

राज्यपाल कार्यालयासह तपास यंत्रणांचा गैरवापर भारतातील श्रेष्ठ असणाऱ्या लोकशाहीला कधीही मजबूत करू शकत नाही. मनीष सिसोदिया ( Manish Sisodia) यांना दिल्लीच्या अबकारी धोरणाबाबत त्यांना अटक करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या या नेत्याला सोमवारी सीबीआय कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आली होती.

सध्या सिसोदिया तिहार तुरुंगात बंदिस्त आहेत.मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी तुरुंगामध्ये त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. केंद्र सरकार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याच्या योग्य प्रक्रियेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे.नऊ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्यांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही स्टॅलिन यांनी केला आहे.

Pm Narendra Modi
Ahmednagar : नगर जिल्हा बँकेसाठी आजची रात्र महत्वाची; अजितदादा अन् थोरांताची बैठक, अध्यक्षाचे नाव ठरले?

तसेच तुम्ही माझ्या मताशी सहमत असणार आहे असा मला पूर्ण विश्वास आहे. भिन्न विचारधारा आणि राजकीय पक्ष हे भारतीय लोकशाहीमधील दोन महत्वाचे घटक आहेत. मनीष सिसोदिया यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे समजल्यापासून मी निराश झालो आहे. या प्रकरणात त्यांचा विनाकारण छळ केला जातो आहे असंही स्टॅलिन यांनी या पत्रात म्हणाले आहेत.

विरोधी पक्षातील प्रमुख ९ नेत्यांचंही मोदींना पत्र

केंद्रीय तपास यंत्रणांकडून मागील काही वर्षात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांनंतर प्रादेशिक पक्षाच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहेत. या पत्रात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर सीबीआयने केलेल्या अटकेच्या कारवाईवरही बोट ठेवण्यात आलं आहे.

कोणतेही पुरावे नसताना ही कारवाई करण्यात आली. सिसोदिया यांच्यावरील आरोप निराधार आणि राजकीय कटातून केलेले आहेत. दिल्लीतील शिक्षण सुधारणेसाठी सिसोदियांना जगभरात ओळखलं जातं. त्यांच्यावरील कारवाईतून सूडाचं राजकारण सुरू असल्याचं आणि भाजपच्या सत्ताकाळात लोकशाही मूल्य धोक्यात आल्याचं दिसत असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com