तालिबानी मानसिकतेमुळं 1947 मध्ये भारताची फाळणी! संघाच्या नेत्याचा दावा

राम माधव हे आरएसएसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहे. त्यापूर्वी ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस होते.
Talibani mindset responsible for Indias partition says Ram Madhav
Talibani mindset responsible for Indias partition says Ram Madhav

कोझिकोड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते राम माधव यांनी 1921 मध्ये केरळमध्ये झालेली मोपला दंगल ही तालिबानी मानसिकतेची देशातील पहिली घटना असल्याचं वक्तव्य केलं आहे. तालिबानी मानसिकतेमुळंच भारताची 1947 मध्ये फाळणी झाली, असंही राम माधव म्हणाले आहेत. (Talibani mindset responsible for Indias partition says Ram Madhav)

राम माधव हे आरएसएसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहे. त्यापूर्वी ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. केरळमधील कोझिकोड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम 1921 मध्ये केरळमध्ये झालेल्या मोपला दंगलीत मृत्यू झालेल्या लोकांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केला होता. 

राम माधव म्हणाले, देशाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला खरा इतिहास माहित आहे. त्यामुळे ते तालिबानी किंवा विभाजनवादी शक्तींना देशात हिंसा करण्यासाठी रोखतील. मग ते केरळ असू किंवा काश्मीर. सध्या संपूर्ण जगाचं लक्ष तालिबानने अफगाणिस्तानवर केलेल्या कब्जावर आहे. तालिबानकडून आधी व आता केल्या जात असलेल्या अत्याचाराला माध्यमे जगासमोर आणत आहेत. पण भारतासाठी ही बाब नवी नाही. काही कट्टरतावादी इस्लामी विचारधारेचे लोक मोपला दंगलीदरम्यान केरळमध्येही असे अत्याचार केले आहेत, असं ते म्हणाले.

1921 मध्ये मोपला दंगलीवेळी माध्यमे तेवढी प्रभावी नव्हती. त्यामुळे त्यावेळी झालेली हिंसा व अत्याचार लोकांसमोर आले नाहीत. या दंगलीविषयी अनेकांना माहिती नाही. त्यामुळे डावी पक्षांचे सरकार याला लपवण्यासाठी किंवा ते दडपण्यासाठी इंग्रज सरकारच्याविरोधात डाव्यांच्या क्रांतीचं रुप देऊन आनंद साजरा करत आहे. विद्रोह करणाऱ्यांना नायकाच्या रुपात पुढे आणले जात आहे, असा आरोप माधव यांनी केला.

केरळमध्ये डाव्यांचं सरकार असल्यानं ते जमीनदारांविरोधाती हा विद्रोह होता, असं दाखवलं जात आहे. या घटनेला पूर्णपणे वेगळा रंग दिला जात आहे. अशा तालिबानी मानसिकेतमुळं 1947 मध्ये भारताची फाळणी झाली. 1946 मध्ये बंगाल आणि नंतर काश्मीरमध्ये पंडितांबाबत झालेल्या घटनांमध्येही ही मानसिकता दिसून आली, असंही माधव यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com