चीन अन् रशियासमोर तालिबाननं घातलं शेपूट पण भारतासमोर फोडली डरकाळी

अमेरिकेच्या ताब्यातून अफगाणिस्तान मुक्त केल्यानंतर आता तालिबान आणि अल कायदा यांनी जगातील मुस्लिमबहुल प्रांतांकडे मोर्चा वळवला आहे.
taliban does not take stand against china and russia
taliban does not take stand against china and russia

नवी दिल्ली : अमेरिकेच्या (USA) ताब्यातून अफगाणिस्तान (Afghanistan) मुक्त केल्यानंतर आता तालिबान (Taliban) आणि अल कायदा (Al-Qaida) यांनी जगातील मुस्लिमबहुल प्रांतांकडे मोर्चा वळवला आहे. त्यांच्या जागतिक जिहादच्या टार्गेटवर आता काश्मीर प्रथमस्थानी आले आहे. याचवेळी चीनमधील (China) शिनझियांग आणि रशियातील (Russia) चेचेन्या या मुस्लिमबहुल प्रांतांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. चीन आणि रशियाने तालिबानला केलेली मदत हे यामागील कारण आहे. 

चीनमधील शिनझियांग आणि रशियातील चेचेन्या या मुस्लिमबहुल प्रांतांकडे तालिबान, अल कायदा तसेच, इतर दहशतवादी संघटनांनी दुर्लक्ष केले आहे. चेचेन्यामध्ये रशियाने मुस्लिमांवर अनेक निर्बंध लादले आहेत. यामुळे इराक आणि सीरियामध्ये लढणारे इसिसचे सर्वाधिक दहशतवादी चेचेन्यामधील होते. चीनकडून शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. परंतु, मागील काही महिन्यांत चीन आणि रशियाने तालिबानला मदत केल्याने या दोन्ही प्रांतांची नावे जिहादमध्ये नाहीत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेतल्यानंतर चीन आणि रशियाने अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली होती. याचबरोबर या दोन्ही देशांनी तालिबानला पाठिंबा दिला होता. याला पाकिस्तानचाही पाठिंबा आहे. पाकिस्तान हा चीन, रशिया आणि तुर्कस्तानच्या मदतीने भारताच्या विरोधात आघाडी उघडण्याचा प्रयत्न करीत आहे.  

अमेरिकेच्या ताब्यातून अफगाणिस्तान मुक्त झाल्यानंतर जागतिक दहशतवादी संघटना जल्लोष साजरा करीत आहेत. यानंतर आता या दहशतवादी संघटनांनी काश्मीरकडे मोर्चा वळवला आहे. यामुळे आगामी काळात काश्मीरला धोका निर्माण होणार आहे. याचबरोबर भारत सरकारची डोकेदुखीही वाढणार आहे. तालिबानला पाकिस्तानने मदत केल्याचे समोर आले आहे. यामुळे भारताच्या काश्मीरकडे तालिबान आणि अल कायदा यांची वाकडी नजर वळण्यामागे पाकिस्तान असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अफगाणिस्तानमधील विजयानंतर दहशतवादी संघटनांचे मनोबल वाढले आहे. अफगाणिस्तानमधील विजयावर अल कायद्याने म्हटले आहे की, आपण सर्वांना अफगाणिस्तानमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पश्चिमी देशांनी मुस्लिम देशांवर लादलेल्या जुलमी सत्तेपासून मुस्लिम समाज स्वातंत्र्य मिळवू शकतो, हे स्पष्ट दिसत आहे. अफगाणिस्तानप्रमाणे इतरही ठिकाणी आपण असाच विजय मिळवू. 

काश्मीर हे अनेकवेळा अल कायदाच्या टार्गेट लिस्टमध्ये राहिले आहे. यासाठी आधी अल कायदाने अन्सार गझवातुल हिंद या संघटनेची स्थापना जम्मू-काश्मीरमध्ये केली होती. भारतावर पुन्हा मुस्लिम सत्ता स्थापन करण्याचा उद्देश यामागे होता. अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी हा पाकिस्तानमध्ये असून, तेथून तो काश्मीरसाठी रणनीती आखत आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com