राजकारणी अन् सरकारी अधिकाऱ्यांना दे धक्का; तालिबानने संपत्तीवर आणली टाच

सत्ता हाती मिळताच तालिबाननने राजकारणी आणि आधीच्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात मोर्चा उघडला आहे.
taliban confiscates cash and gold of politicians and government officers
taliban confiscates cash and gold of politicians and government officers

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. सत्ता हाती मिळताच तालिबाननने राजकारणी आणि आधीच्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी कमावलेले कोट्यवधी रूपये आणि सोने तालिबानने जप्त करुन त्यांना दणका दिला आहे. यात देशाचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांचाही समावेश आहे. 

तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या मध्यवर्ती बँकेने ही कारवाई केली आहे. या बँकेने रोख रक्कम व सोने अशी एकूण 12.4 दशलक्ष डॉलरची मालत्तमा जप्त केली आहे. राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या सरकारी निवासस्थानात ही रोख रक्कम आणि सोने ठेवलेले सापडले. राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी कमावलेल्या संपत्तीकडे तालिबानचा आता रोख आहे. 

माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह हे सध्या बेपत्ता आहेत. त्यांनी तालिबानशी लढा देण्याचा निर्धार केला आहे. मागील आठवड्यात त्यांचा भाऊ रोहुल्लाह अझिजी याची हत्या तालिबानने केली होती. दरम्यान, मध्यवर्ती बँकेने नागरिकांना देशातील अफगाणी चलनाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. देशात डॉलरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, डॉलरची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी अफगाणी चलनाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. 

अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून हंगामी सरकारची घोषणा करण्यात आली असून, मोहम्मद हसन अखुंद हा सरकारचं नेतृत्व करणार आहे. देशाचे पंतप्रधानपद अखुंद याच्याकडे तर उपपंतप्रधानपद मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्याकडे देण्यात आले आहे.  तालिबानने नुकतेच मंत्रिमंडळ जाहीर केले. हे मंत्रिमंडळ अंतरिम असून त्यामध्ये आणखी काही मंत्र्यांच्या नावे समाविष्ट केली जाणार आहेत. पंतप्रधानपद मिळालेला अखुंद हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा सहकारी आहे. तो सध्या तालिबानच्या तालिबानमध्ये महत्वाचे निर्णय घेणाऱ्या परिषदेचा प्रमुख आहे. त्याचं नाव संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीतही असल्याचं वृत्त आहे. 

लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले होते. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केले होते.  

हेही वाचा : जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तींमध्ये तालिबानी मुल्ला बरादर 

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com