राष्ट्रपती देश सोडून पळाले; अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता

तालिबानचा कमांडर मुल्लाअब्दुल गनी बरदारअफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो.
राष्ट्रपती देश सोडून पळाले; अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता
Taliban commanders says taken control of Afghan presidential palace

काबुल : तालिबान्यांनी काबुलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तान चे राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळाले आहेत. ते ताजिकिस्तान देशात गेल्याची माहिती आहे. तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. (Taliban commanders says taken control of Afghan presidential palace)

तालिबानच्या दहशतीसमोर अफगाणिस्तान सरकार झुकल्याचं वृत्त आहे. तालिबान्यांनी रविवारी (ता. 15) सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले आहेत. सर्वबाजूने काबूलला घेरण्यात आलं असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तालिबान्यांनी काबुलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार पुरतं घाबरलं होतं. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केलं होतं. त्यानुसार राष्ट्रपती भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अशरफ घनी यांनी देश सोडला.

घनी हे त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिद आणि दुसऱ्या निकटवर्ती सहकाऱ्यासह गेले आहे. दिवसभर घडलेल्या घडामोडींनंतर तालिबानने राष्ट्रपती भवनही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळं आता संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या अधिपत्याखाली आलं आहे. मागील सुमारे 100 दिवसांपासून तालिबानने अफगाणिस्तानला जेरीस आणले होते. एक-एक राज्य काबीज करत त्यांनी अखेर रविवारी संपूर्ण देशावर कब्जा केला आहे. 

दरम्यान, मुल्ला अब्दुल गनी बरादर हा मुल्ला उमर यांचा सर्वात विश्वासू कमांडर असल्याचं सांगितलं जात आहे. ते तालिबान सरकारचे सध्याचे अध्यक्ष आहेत. अफगाणिस्तानमध्ये 1994 मध्ये तालिबान आंदोलन सुरू करणाऱ्या चार जणांपैकी मुल्ला बरादर हे एक आहेत. त्याला 2010 मध्ये कराची येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये पाकिस्तानने त्याची सुटका केली. 

सैन्याला माफ करत आहोत

तालिबानने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालिबानच्या सैन्याला काबूलच्या सीमांवरच थांबायला सांगितले आहे. आम्ही सामान्य लोक किंवा सैन्याविरोधात बदल्याच्या भावनेतून कोणतीही कारवाई किंवा हल्ला करणार नाही. तालिबान अशा सर्वांना माफ करत आहे. तसेच सगळ्यांनी घरीच राहावे, देश सोडण्याचा प्रयत्न करू नये, अशी धमकीही देण्यात आली आहे. 

Related Stories

No stories found.