नाग अन् सापानं एकत्र येऊन मला हरवलं! मौर्य यांचा धक्कादायक कबुलीजबाब

उत्तर प्रदेशातील मातब्बर नेते स्वामीप्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
Swami Prasad Maurya
Swami Prasad MauryaSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात निवडणुकीआधी (UP Election 2022) भाजपला रामराम ठोकत काही नेत्यांनी समाजवादी पक्षात (Samajwadi Party) प्रवेश केला होता. त्यामध्ये पाच वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांचाही समावेश होता. पण त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवानंतर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

स्वामीप्रसाद मौर्य यांचा फाजिलनगर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे (BJP) सुरेंद्रकुमार कुशवाह यांनी त्यांचा दारूण पराभव केला. मौर्य यांना 29 हजार 647 तर कुशवाहा यांना जवळपास 56 हजार मतं मिळाली. मौर्य यांनी त्यांचा पडरौना मतदारसंघ सोडत फाजिलनगर म्हणून निवडणूक लढवली होती. यावर अखेर मौर्य यांनी त्यांची बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, नेहमी मुंगूसच ताकदवान असते. मात्र, नाग आणि सापाने एकत्र येऊन मुंगसाला जिंकू दिले नाही. मुंगूस मी मोठे असते हे मी आधीचे सांगितले होते. त्यावर मी ठाम आहे.

Swami Prasad Maurya
शिवसेना `मैदानात` उतरल्याने महापौर ताहेरा शेख यांची कोंडी अटळ!

त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य (Sanghmitra Maurya) या भाजपच्या खासदार आहेत. भाजप नेत्यांनी सांगितले तरी आपल्या वडिलांविरोधात प्रचार करणार नाही, असं संघमित्रा यांनी स्पष्ट केलं होतं. त्या उघडपणे भाजपविरोधात काम करत होत्या. त्यामुळे भाजपनेही हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला होता.दरम्यान, मौर्य यांच्यासोबत भाजप सोडलेले धरमसिंह सैनी यांचाही पराभव झाला आहे. दारासिंह चौहान यांनी मात्र पुन्हा आमदार बनले आहेत. सैनी यांचा नकुड मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांना भाजपचे मुकेश चौधरी यांनी पराभूत केले. त्याचप्रमाणे दारासिंह चौहान यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. पण त्यांनी घोसी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे विजय कुमार राजभर यांचा चार हजार मतांनी पराभव केला.

लखीमपूर खीरीनं विरोधकांना दिला जोरदार झटका

मागील वर्षी लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशात विरोधकांनी भाजपला घेरलं होतं. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालत चिरडल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली होती. लखीमपूर खीरी घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघात भाजपला एकही मतदारसंघात विजय मिळाला नव्हता. या घटनेमुळे यंदाही हेच चित्र पाहायला मिळेल, असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात निकाल हाती आल्यानंतर अगदी उलट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व आठ मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. लखीमपूर मतदारसंघासह पलिया, निघासन, गोला, श्रीनगर, धौरहरा, कसता आणि मोहम्मदी या मतदारसंघातील मतदारांनी भाजपलाच साथ दिली आहे. या मतदारसंघामध्ये कुठल्याच पक्षाचा करिष्मा चालला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com