भाजप नेत्यांना स्वाहा करणार! पक्ष सोडताच बड्या नेत्याने डागली तोफ

योगी अदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री स्वामी प्रसाद मोर्य (Swami Prasad Maurya) यांनी आपल्या मंत्रीपदाच्या राजीनामा देत समाजवादी पक्षात (SP) प्रवेश केला आहे.
भाजप नेत्यांना स्वाहा करणार! पक्ष सोडताच बड्या नेत्याने डागली तोफ
Swami Prasad MauryaSarkarnama

लखनौ : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election-2022) तारखा जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, सत्तेत असलेल्या भाजपला (BJP) जोरदार धक्का बसला आहे. ओबीसींचे मातब्बर नेते म्हणून ओळख असलेले योगी अदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मंत्रीमंडळातील रोजगार समन्वय मंत्री स्वामी प्रसाद मोर्य (Swami Prasad Maurya) यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत समाजवादी पक्षात (SP) जाहीर प्रवेश केला आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी भाजपमध्ये स्वत:ला तोफ समजणाऱ्या भाजप नेत्यावर आगामी निवडणुकीत अशी तोफ डागणार की ते त्यामध्ये स्वाहा होतील, अशा शब्दात मोर्य त्यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

Swami Prasad Maurya
भाजपत खळबळ; मंत्र्याने पक्ष सोडताच तासाभरात तीन आमदारांचा रामराम

मोर्य म्हणाले, उत्तर प्रदेशातील राजकारण हे आपल्या अवतीभोवती फिरते. उत्तरप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण भाजपमध्ये स्वत:ला तोफ समजणाऱ्या नेत्यांवर अशी तोफ डागणार की त्यात त्यांचा स्वाहा करु, अश्या शब्दात त्यांनी भाजप नेत्यांना व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगींना आव्हान दिले आहे. मोर्य यांनी पक्ष सोडल्याने उत्तरप्रदेश भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Swami Prasad Maurya
भाजपचे तेरा आमदार पक्ष सोडणार; शरद पवारांनी टाकला बॉम्ब

मोर्य यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना दिल्यावर समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. याबाबतची अधिकृत माहिती अखिलेश यादव यांनी आपल्या ट्वीटर हॅडलनरून दिली आहे. दरम्यान, आपल्या सोबत आलेल्या समर्थकांना समाजवादी पक्षाकडून तिकीट मिळणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, याबाबत अद्याप कुठलीही बोलणी झाली नाही. याबाबत मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, आगामी उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना आपली ताकद दाखवणार, असे त्यांनी सांगितले आहे.

मोर्य यांना आपण नेमका पक्ष का सोडला असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींने विचारल्यावर त्यांनी यावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले व याबाबत राजीनामा पत्रात आपण कारण दिल्याचे त्यांनी सांगितले. मोर्य यांनी भाजप नेत्यांना दिलेले आव्हान हे नेमके कुणाला दिले याबाबत मात्र, चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. मोर्य हे ओबीसी समाजाचे नेते असून त्यांना मानणारा उत्तरप्रदेशात मोठा वर्ग आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत ते भाजपचे किती नुकसान आणि समाजवादीला किती फायदा करून देतात हे मात्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Swami Prasad Maurya
'किरीट सोमय्या म्हणजे तमाशातला गांजाडा'

दरम्यान, मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती व भगवती सागर या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. तिघेही मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मौर्य हे अखिलेश यादव यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मागील निवडणुकीत भाजपला जातीच्या राजकारणाने सत्तेत पोहचवल्याचे मानले जाते. दलित, मागासवर्गाच्या मतदानाचा टक्का अधिक असल्याने अखिलेश यादव यांनीही आता याकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे भाजपमधील या नेत्यांनाही आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच मौर्य यांचा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.