उद्धव ठाकरे वर्गणी द्यायला तयार असतील तरच मी मातोश्रीवर जाईन..!

अयोध्येतील भव्य राम मंदिर तीन वर्षांत साकारले जाणार आहे. या मंदिराच्या निर्माणासाठी देशभरात वर्गणी गोळा करण्याची मोहीम सुरू आहे.
swami govind dev giri says if uddhav thackeray willing to give donation for ram temple
swami govind dev giri says if uddhav thackeray willing to give donation for ram temple

मुंबई : अयोध्येतील भव्य अशा राम मंदिराच्या निर्माणाची लगबग सुरू आहे. या मंदिराचे बांधकाम येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार असून, त्याच्या उभारणीसाठी तब्बल अकराशे कोटी रुपयांचा खर्च होणार आहे, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी यांनी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्गणी द्यायला तयार असतील तरच मी मातोश्रीवर जाईन, असे त्यांनी म्हटले आहे. 

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होते. या भव्य अशा भूमिपूजन सोहळ्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. आता अयोध्येत प्रत्यक्ष मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. याविषयी स्वामी गोविंददेव गिरी  म्हणाले की, मुख्य मंदिराचे बांधकाम तीन ते साडेतीन महिन्यांत पूर्ण होणार आहे. या बांधकामासाठी ३०० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च होईल. त्याचप्रमाणे, मंदिराच्या संपूर्ण ७० एकर जमिनीवरील इतर बांधकाम, विकासकामांसाठी अकराशे कोटी रुपयांचा खर्च येईल. राम मंदिर निर्माण प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी ही आकडेवारी सांगितला आहे. राम जन्मभूमी न्यासाने आत्तापर्यंत खर्चाची अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही. 

राम मंदिरासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही स्वामींनी मागील आठवड्यात भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रपतींनी पाच लाख शंभर रुपयांचा निधी दिला होता. देशभरातील साडेसहा लाख गावांमध्ये जाऊन 15 कोटी घरांतून राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट देऊन राम मंदिरासाठी वर्गणी घेणार का, अशी विचारणा केली असता स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले की, ते वर्गणी द्यायला तयार असतील तर मी त्यांच्याकडे जाईन. शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंदिराच्या निर्माणासाठी एक किलो चांदीची वीट दिलेली आहे.  

राम मंदिरासाठीचा निधी ही २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने आखलेली मोहीम असल्याचाही आरोप होत आहे. हा आरोप स्वामी गोविंददेव गिरी यांनी खोडून काढला. ते म्हणाले, की लोकांना डोळ्यावर लावलेल्या चष्म्याच्या रंगाप्रमाणे जग दिसत असते. आम्ही कोणताही चष्मा लावलेला नसून. मंदिराच्या निर्मितीसाठी समर्पण भावनेने काम करीत आहोत. काही बडे उद्योजक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राम मंदिराचा पूर्ण खर्च देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, आम्ही त्याला नम्रपणे नकार दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com