आयपीएस अधिकाऱ्याचे आधी निलंबन अन् आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल

जी. पी. सिंह हे राज्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेले पहिले अधिकारी ठरले आहेत.
Suspended Chhattisgarh IPS officer booked for sedition
Suspended Chhattisgarh IPS officer booked for sedition

रायपूर : उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याच्या कारणास्तव लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कचाट्यात सापडल्याने एका आयपीएस (IPS) अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून ते सरकारविरोधातच षडयंत्र रचत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या आयपीएस अधिकाऱ्यावर गुरूवारी रात्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Suspended Chhattisgarh IPS officer booked for sedition)

जी. पी. सिंह असे अधिकाऱ्याचे नाव असून ते छत्तीसगढमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) या पदावर कार्यरत होते. अद्यापपर्यंत पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. जी. पी. सिंह हे राज्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेले पहिले अधिकारी ठरले आहेत. सिंह हे 1994 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. मागील वर्षी जून महिन्यात राज्य पोलिस अकादमीमध्ये बदली होण्यापूर्वी ते एसीबीचे अतिरिक्त महासंचालक होते. 

त्यांच्या सरकारी कार्यालयावर एक जुलै रोजी पहाटे छापा टाकण्यात आला होता. त्याचबरोबर अन्य 15 ठिकाणीही एकाचवेळी छापेमारी करण्यात आली होती. जवळपास तीन दिवस चाललेल्या या कारवाईमध्ये त्यांच्याकडे सुमारे 10 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळून आली. त्यांच्या बंगल्यामागील गटारात अनेक कागदपत्रेही आढळून आली. याच कागदपत्रांतील मजकूरांवरून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिंह यांच्याकडे सापडलेली डायरी व पेन ड्राईव्हमध्ये सरकारच्या विरोधातील अनेक मजकूर आढळून आले आहेत. एसीबीकडून ही कागदपत्रे तीन दिवसांपूर्वीच पोलिसांना दिली आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी दोन दिवस या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर छापेमारीत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचेही जबाब घेण्यात आले. त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय म्हटले आहे एफआयआरमध्ये?

प्राथमिक तपासानंतर एसीबीकडून 48 पानांचा अहवाल पोलिसांना सादर कऱण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांविरोधीत आक्षेपार्ह वक्तव्य आढळून आली आहेत. तसेच त्यांच्याविरोधात षडयंत्राची रचले जात असल्याचेही दिसून आले. तसेच विविध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, प्रतिनिधींचे यामध्ये विश्लेषणही करण्यात आले आहे. अनेक सरकारी योजना, धोरणे, सामाजिक आणि धार्मिक मुद्यांशी संबंधित मजकूर या कागदपत्रांमध्ये असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com