sushat.jpeg
sushat.jpeg

सुशांतचे वडीलही म्हणतात..त्याने आत्महत्या केली असावी..

के.के सिंह यांनी म्हटले आहे की सुशांतच्या आत्महत्येबाबत मला कुणाबाबतही तक्रार नाही. माझा कुणावरही संशय नाही.

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आज सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी केलेल्या विधानामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. के.के सिंह यांनी म्हटले आहे की नैराश्यामुळे सुशांतने आत्महत्या केली असावी. सुशांतच्या आत्महत्येबाबत मला कुणाबाबतही तक्रार नाही. माझा कुणावरही संशय नाही. 

के. के. सिंह यांनी यापूर्वी पाटना येथील राजीव नगर येथील पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीत सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुंटुबियावर संशय व्यक्त केला होता. रिया चक्रवर्तीवर आरोप केला होता.
एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार के.के. सिंह यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. के.के.सिंह म्हणाले होते की मला माहित नाही माझ्या मुलानं आत्महत्या का केली. त्याने कधीही त्याच्या नैराशाबाबत चर्चा केली नाही. सुशांतच्या मृत्यूबाबत माझी काहीही तक्रार नाही किंवा कुणावर संशयही नाही. 

 
ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत; राऊतांचा कंगनाला टोला
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने टि्वटरवर खेळण्यापेक्षा बाॅलीवूडमधील ड्रग माफियांबद्दल ट्वीटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे त्याबाबतचे पुरावे द्यावेत, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले. कंगना राणावत सारख्यांना किती महत्व द्यायचं हे मीडियाने ठरवलं पाहिजे, असाही टोला त्यांनी लगावला.  संजय राऊत आपल्याला उघडपणे धमकी देऊन मुंबईत येऊ नकोस, असे सांगत असल्याचा आरोप कंपनाने ट्वीटरवर केला आहे. त्याबाबत राऊत बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातली मंदीर उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "जनतेचं हित लक्षात घेऊन सरकारचा मंदिरांबाबतचा निर्णय आहे. सरकारला मंदिरं बंद करण्याची हौस नाही. फक्त राजकारणासाठी विरोध करू नये, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. काल कोरोनाच्या आकड्यात महाराष्ट्रासह देशात वाढतो आहे. पंढरपूरला आंबेडकरांच्या आंदोलनात नियमांचा फज्जा उडाला. या सर्वांनी थोडा संयम बाळगायला हवा, महाराष्ट्राचं अहित होणार नाही याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारप्रमाणे कोरोनाला 'ऍक्ट ऑफ गॉड' मानायला तयार नाही. त्यामुळे या कोरोनाशी आपल्यालाच लढायचं आहे"

 Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com