धक्कादायक : सुशांतची बहीणच पार्टीमध्ये ड्रग्ज घेत होती...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास एनसीबी करीत आहे. या प्रकरणी सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी ही एनसीबीसमोर चौकशीसाठी आज हजर झाली.
sushant singh rajputs sister was taking drugs at party said shruti modis lawyer
sushant singh rajputs sister was taking drugs at party said shruti modis lawyer

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी हिची आज चौकशी होणार होती. या चौकशीसाठी ती एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली. मात्र, चौकशी करणारा अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ती परत गेली. तिच्या वकिलांनी या प्रकरणी आता सुशांतच्या बहिणीवर धक्कादायक आरोप केले आहेत. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.  

रिया चक्रवर्तीच्या चौकशीत तिने बॉलीवूडमधील कलाकारांची नावे उघड केली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान, राकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना या आठवड्याच्या अखेरीस चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. 

आज श्रुती मोदी ही चौकशीसाठी हजर झाली. तिची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या पथकातील एका अधिकाऱ्याने केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे नेमके त्याचवेळी समजले. यामुळे एनसीबी श्रुती मोदीची चौकशी तात्पुरती स्थगित केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

श्रुतीच्या वकिलांना सुशांतच्या बहिणीवर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, सुशांतच्या  एका ड्रग्ज पार्टीला त्याची एक बहीण उपस्थित होती. तिनेही त्या पार्टीमध्ये ड्रग्ज घेतले होते. असे असतानाही सुशांतच्या बहिणी तो ड्रग्ज घेत असल्याचे माहिती नसल्याचा दावा करीत आहेत. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com