सुशांतने मोदींना मागे टाकून पटकावला प्रथम क्रमांक तर रिया तिसऱ्या क्रमांकावर; कंगना पिछाडीवर

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची अटक यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. त्यामुळे हे दोघे यावर्षी कायम चर्चेत राहिले.
Sushant Singh Rajput is Yahoos most searched person of 2020
Sushant Singh Rajput is Yahoos most searched person of 2020

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू  आणि त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीची अटक यामुळे मोठा गदारोळ उडाला होता. सुशांतच्या संशयास्पद मृत्यूमुळे या प्रकरणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सगळीकडे सुशांत आणि रियाचीच चर्चा होत होती. आता याहू सर्च इंजिनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक सर्च झालेल्या सेलिब्रेटींच्या यादीत  सुशांत या वर्षी प्रथम स्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या स्थानी तर रिया चक्रवर्ती तिसऱ्या स्थानी आहे. 

सुशांतच्या मृत्यू प्रकरणामुळे निर्माण झालेला वाद त्याचे आणि रियाचे नाव जास्त सर्च होण्यास कारणीभूत ठरला आहे. सर्वाधिक सर्च झालेल्या सेलिब्रेटींच्या यादीत राजकारणी अधिक आहेत.  यात सुशांत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रिया चक्रवर्ती ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

या यादीत समावेश असलेल्या इतर कलाकारांमध्ये नवव्या क्रमांकावर अमिताभ बच्चन, दहाव्या क्रमांकावर कंगना राणावत, बाराव्या क्रमांकावर दीपिका पदुकोण, चौदाव्या क्रमांकावर सनी लिओनी, पंधराव्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आणि सोळाव्या क्रमांकावर कॅटरिना कॅफ यांचा समावेश आहे. 

सर्वाधिक सर्च झालेल्या पुरुष सेलिब्रेटींच्या यादीत सुशांत पहिल्या स्थानी आहे. यानंतर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, इरफान खान, ऋषि कपूर, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, सोनू सूद, अनुराग कश्यप आणि अल्लू अर्जुन यांनी स्थान पटकावले आहे. 

सर्वाधिक सर्च झालेल्या महिला सेलिब्रेटींच्या यादीत रिया चक्रवर्ती पहिल्या स्थानी आहे. यानंतर कंगना राणावत, प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ, नेहा कक्कर, कनिका कपूर, करीना कपूर खान आणि सारा अली खान यांनी स्थान मिळवले आहे. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. नंतर सर्वोच्च  न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला होता. 

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर आला होता. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) रिया चक्रवर्ती हिला एनसीबीने 6 सप्टेंबरला अटक केली होती. त्याआधी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांना एनसीबीने 4 सप्टेंबरला अटक केली होती. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली होती. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला होता. या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्यासह काही जणांची एनसीबीने चौकशी केली होती. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com