सुरेश प्रभू भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार? : अमित शहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Suresh Prabhu | BJP | Vice President : राजकारणातून निवृत्ती घेतलेले प्रभू पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी येणार?
Suresh Prabhu | Amit Shah
Suresh Prabhu | Amit Shah Sarkarnama

नवी दिल्ली : माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) हे भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. आज दिल्लीमध्ये प्रभूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेवून चर्चा केली. या भेटीचा फोटो व्हायरल होताच प्रभू यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून त्यांनी निवडणुकींच्या राजकारणातूनही निवृत्ती घेतली आहे. ते पूर्वी ४ वेळा लोकसभेवरही खासदार होते. (Suresh Prabhu Meet BJP Leader Amit Shah)

सुरेश प्रभू हे शांत, संयमी, अजात शत्रू आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. व्यवसायाने चार्टड अकॉऊन्टट असलेल्या प्रभू यांचा सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष ते केंद्रीय मंत्री असा थक्क करणारा प्रवास राहिला आहे. प्रभू हे कोकणातील नेते म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मुंबईतील दादर परिसरात झाले. सारस्वत बॅंकेच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे.

सुरेश प्रभू हे २०१४ पूर्वी शिवसेनेत होते. शिवसेना पक्षातूनच त्यांनी १९९६ मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातील पहिल्यांदा निवडणूक लढविली अन् निवडून आले. पुढे १९९८, १९९९, आणि २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. १९९८ साली ते केंद्रातील वाजपेयी मंत्रिमंडळात वने व पर्यावरण खात्याचे, खते व रसायन खात्याचे मंत्री बनले. पुढे देशात काँग्रेसचे सरकार आले तरीदेखील शिवसेनेत असलेल्या सुरेश प्रभू यांना काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारने नद्याजोड प्राधिकरणचे अध्यक्ष बनविले

२००९ च्या निवडणुकीत मात्र प्रभू यांना निलेश राणे यांच्या हातून पराभव स्विकारावा लागला. पुढे २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता येताच त्यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांना केंद्रात रेल्वे मंत्री करण्यात आले. प्रभू यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नदीजोड प्रकल्पासाठीही त्यांनी योगदान दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in