Supriya Sule News : खोटे कारण देत राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश...सुप्रिया सुळेंना फसवणारा 'तो' नेता कोण?

Supriya Sule News : एका मुलाखतीत सुप्रिया सुळेंनी सांगितला खिस्सा
Supriya Sule News
Supriya Sule NewsSarkarnama

Supriya Sule News : राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या संदर्भातील एक खिस्सा राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितला आहे.

एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुळे म्हणाल्या की ''एका नेत्याचा मला फोन आला आणि ते मला म्हणाले, माझ्या वडिलांच्या विरोधातील जुन्या केसेस भाजप (BJP) पुन्हा सक्रिय करेल आणि आम्हाला जेलमध्ये टाकेल. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो. तेव्हा त्यांना मी भेटालयला बोलावले, आणि चर्चा केली. मी त्यांना सांगीतले की घाबरण्याचे काही कारण नाही.

Supriya Sule News
Uddhav Thackeray News : राठोड, कदम, गोगावलेंनंतर आता दादा भुसेंचा नंबर; ठाकरेंनी डाव टाकला

काही होणार नाही. माझ्या भोळेपणाचा त्या नेत्याने फायदा घेतला. तसेच त्यांनी खोटे सांगून पक्ष सोडला. नंतर मी त्यांच्या संदर्भातील केसेसची माहीत घेतली, असता त्याने मला खोट्या केसचे कारण देत फसवल्याचे लक्षात आले, असे सुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याने खोटे कारण देत भाजपमध्ये प्रवेश केला? सुळे यांना फसविणारा नेता कोण? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

चॅनलच्या मुलाखतीत सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता, तुम्हाला आयुष्यात कोणी धोका दिल्याची भावना कधी झाली का? या प्रश्नाचे उत्तर देताना सुळे म्हणाल्या 'मी त्या नेत्याचे नाव आता सांघणार नाही. मात्र, महाविकास आघाडी स्थापन झाली म्हणजे २०१९ च्या आधीची ही गोष्ट आहे. त्या नेत्याने आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याने मला त्यावेळी खूप त्रास झाला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचा एक नेता, आपल्या वडिलांप्रमाणे अनेक वर्षे राजकारणात आहे. ते मला माझ्या कुटुंबातील सदस्यासारखेच होते. पक्ष सोडण्यासाठी त्यांनी जुन्या केसेसच्या अडचणी सांगितल्या. मी म्हटले घरी या. तुम्हाला काही अडचणी येत असतील त्यावर आपण बोलू. त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता, असे मी त्यांना सांगितले होते.

घरी आल्यानंतर त्याच्यासोबत चर्चा झाली. ते नेते म्हणाले की, मी भाजपमध्ये गेलो नाही तर माझ्या वडिलांना जेलमध्ये जावे लागेल. आमच्याविरोधात पुन्हा केसेस सक्रिय केल्या जातील. याबाबत चर्चा झाल्यानंतर विचार करून सांगतो, असे त्या नेत्याने सांगितल, असे सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Supriya Sule News
Maharashtra Cabinet expansion : जळगावातून मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कुणाची वर्णी लागणार?

आघाडीची सत्ता आल्यानंतर संबंधित खात्यातील मंत्र्याला फोन करून मी त्या केसबाबत माहिती मागितली. त्या मंत्र्याने सांगितले की, या केसची माहिती बाहेर कोणालाही देता येत नाही. मात्र, या केसमध्ये काहीही दम नाही. या घटनेनंतर त्या नेत्यांनी फसविल्याचे मला समजले, असे सुळे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com