सुप्रिया सुळे पुन्हा 'संसदरत्न' : सलग ७ व्या वर्षी मिळाला मानाचा पुरस्कार

Supriya Sule | Sansad Ratn | माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे
Supriya Sule 
Supriya Sule Sarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा 'संसदरत्न' ठरल्या आहेत. विशेष म्हणजे हा मानाचा पुरस्कार त्यांनी सगल ७ व्या वर्षी पटकवला आहे. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. गतवर्षी देखील याच संस्थेने त्यांना संसद महारत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना या फौंडेशनतर्फे २०१० पासून संसदरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या १२ वर्षांपासून संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत ७५ खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या २६ मार्च रोजी दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून चालू यावर्षीही लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ४०२ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर ८ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com