
Supreme Court Live : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. निकालामध्ये राज्यपालांनी घेतलेले निर्णय न्यायालयाने अवैध ठरवले आहे. याशिवाय, ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांना व्हीपच म्हणून मान्यता दिली आहे. यासंदर्भात कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवले.
शिंदे सरकारला काही दिवसांसाठी संजीवनी मिळाली असल्याचे सरोदे म्हणाले. न्यायालयाने व्हिपबाबात निर्णय दिल्याने आता सर्व सूत्र ही प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडे गेली आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता अॅक्शन मोडमध्ये विधानभवनात दिसतील. मात्र, व्हिपच्या निमित्ताने पात्रता आणि अपात्रता यांची एक नवीन गुंतागुंत तयार हऊ शकते.
हे प्रकरण पुन्हा न्यायालयात जाऊ शकते. सुनील प्रभू यांच्या व्हिपचे उल्लंघन करेल तो अपात्र ठरेल, असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय कोणतीही कालमर्यादा न देता लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे न्यायालयाने म्हटले आहे.
नार्वेकर यांना निष्पक्षपणे निर्णय घेण्याची एक संधी आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीमधील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचेही सरोदे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा स्पष्ट आहे, त्यावर पुर्नविचार याचिका होऊ शकत नाही. कारण कायद्याच्या मुद्द्यांवर पुर्नविचार याचिका होऊ शकते, असे सरोदे यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.