तुरुंगातून बाहेर आलेल्या नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा

हनुमान चालिसा प्रकरणात नवनीत राणा व रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुरुंगातून बाहेर आलेल्या नवनीत राणांना  सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा
MP Navneet RanaSarkarnama

नवी दिल्ली : हनुमान चालिसा प्रकरणावरून तुरुंगातून गुरूवारी बाहेर आलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court) जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. प्रमाणपत्र रद्दच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यावर गुरूवारी सुनावणी झाली.

नवनीत राणा यांचा विवाह रवी राणा (Ravi Rana) यांच्याशी २०१३ मध्ये झाला. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. त्याची पडताळणी करण्यात आली होती. या प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवले होते. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये ज्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली, तेच प्रमाणपत्र मागील वर्षी उच्च न्यायालयाने रद्द केले आहे.

MP Navneet Rana
प्रकृती अत्यवस्थ असल्याने नवनीत राणा तुरुंगातून थेट लीलावती रुग्णालयात

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायालयाने 22 जून रोजी या निकालाला स्थगिती दिल्याने राणांना दिलासा मिळाला आहे. त्यावर न्यायालयात गुरूवारी सुनावणी होणार होती. पण न्यायालयाने आता पुढील तारीख देत जुलै महिन्यात सुनावणी घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राणा यांना आता पुन्हा एकदा दोन महिन्यांचा दिलासा मिळाला आहे.

न्यायमूर्ती विनीत सरण आणि जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. राणा यांच्यामार्फत ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. आता जुलै महिन्यात ही सुनावणी नवीन खंडपीठापुढे होईल. कारण न्यायमूर्ती सरण हे 10 मे रोजी निवृत्त होत आहेत. दरम्यान, राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनीही उपस्थित केला होता.

MP Navneet Rana
भिडे, एकबोटेंना कधी भेटलो नाही! शरद पवारांचं उलटतपासणीत उत्तर

नवनीत राणा लीलावती रुग्णालयात

मुंबई सत्र न्यायालयाने राजद्रोहाच्या प्रकरणात जामीन मंजूर केल्यानंतर नवनीत राणा गुरूवारी तेरा दिवसांनी तुरुंगाबाहेर आल्या. त्यानंतर त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानेच्या त्रासामुळे त्यांच्या जे. जे. रुग्णालयातही उपचार सुरू होते. पण हा त्रास बळावल्याने तुरुंगातून बाहेर येताच त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. तिथे तपासणी करण्यात आल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.