Maharashtra political crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर तारीख पे तारीख; पुढील सुनावणी 'या' तारखेला होणार

Supreme Court On shinde Fadnavis Government: राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी गेल्या ६ महिन्यांपासून लांबणीवर टाकली जात आहेत.
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest NewsSarkarnama

Shinde Fadnavis Government: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे मंगळवारी (दि.१०) महत्वपूर्ण सुनावणी झाली. ही सुनावणी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे झाली. आता या याचिकांवरील पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर पडला आहे. कारण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल अशी माहिती CJI डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. 

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
'अतिशहाणे' मंत्री म्हणत संजय राऊतांचा मुनगंटीवारांवर हल्लाबोल ; म्हणाले,''कानामधील बोळे काढून..''

राज्यात जून महिन्यामध्ये मोठा राजकीय भूकंप घडला होता. यात शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आल्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार व काही खासदारांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. शिंदेंनी भाजपसह सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदे आणि ठाकरे गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शिंदेंनी भाजपसह सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटानं शिवसेना पक्ष, चिन्ह यावर दावा ठोकला होता.

तर ठाकरे गटानं १६ अपात्र आमदारांसह विविध मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी गेल्या ६ महिन्यांपासून लांबणीवर टाकली जात आहेत.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Amravati Vidhan Parishad : अमरावतीसाठी राष्ट्रवादीही प्रचंड आग्रही : महाआघाडीत जागावाटपावरून पेच

''..त्यामुळं सगळं काही प्रेमानं होईल!''

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं १४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी घेतली जाणार आहे. आमचं घटनेवर प्रेम आहे. त्यामुळे कोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. सात सदस्यीय घटनापीठ किंवा आत्ता असलेलं पाच सदस्यीय घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे. १४ फेब्रुवारीचा दिवस हा व्हॅलेंटाईन डे चा दिवस असल्यानं सगळं काही प्रेमाने होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाच्या त्या मागणीवर चर्चा नाही..

ठाकरे गटानं ही सुनावणी 5 ऐवजी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे करावी अशी मागणी करण्यात आली आहे. महिनाभरानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आजच्या कामकाजाच्या सकाळच्या सत्रात ही सुनावणी पार पडली. मात्र, ठाकरे गटाची 7 न्यायमूर्तींकडे प्रकरण सोपवण्याची मागणीवर कोणतीही चर्चा झाली नाही.

शिवसेना नेमकी कुणाची? निवडणूक आयोगासमोर महत्वपूर्ण सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्षानंतर उद्भवलेल्या शिवसेना नेमकी कुणाची ठाकरेंची की शिंदेंची ? याविषयी दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह याबाबत महत्वपूर्ण सुनावणी निवडणूक आयोगासमोर मंगळवारी दुपारी तीन वाजता ही सुनावणी होणार आहे. यात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in