Mohammad Faizal Case: राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना 'सुप्रीम' दणका; अपात्रतेची टांगती तलवार?

Mohammad Faizal Disqualification Case : काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना दिलासा मिळाल्याबाबतचा दाखलाही देण्याचा प्रयत्न..
Mohammad Faizal Disqualification :
Mohammad Faizal Disqualification : Sarkarnama

New Delhi : केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीप येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. यामुळे आता फैजल यांच्या खासदारकीवर पुन्हा एकदा अपात्रतेची टांगती तलवार लटकलेली आहे. (Latest Marathi News)

हत्या करण्याचा प्रयत्न या आरोपाप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाकडून केरळ उच्च न्यायालयाला या प्रकरणी घेतलेल्या निर्णयावर ६ आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत, यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानण्यात येतो.

Mohammad Faizal Disqualification :
Mohammed Faizal News: राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा! मोहम्मद फैजल यांना पुन्हा एकदा मिळाली खासदारकी...

केरळ उच्च न्यायालयाला पुनर्विचार करण्याचे निर्देश -

केरळ उच्च न्यायालयाने मोहम्मद फैजल यांच्या प्रकरणात कायद्यातील सर्व बाबींचा विचार केला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा केरळ उच्च न्यायालयाला पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. याबाबत केरळ न्यायालयाला 6 आठवड्यात फैजल यांच्या शिक्षेच्या स्थगितीबाबत पुनर्विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र जो पर्यंत उच्च न्यायालय निर्णय घेत नाही तोपर्यंत त्याची शिक्षा स्थगित राहील, असे स्पष्ट केले आहे.

Mohammad Faizal Disqualification :
Big responsibility to Rohit Pawar : शरद पवारांचे एक पाऊल पुढे; रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंना मोठी जबाबदारी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना दिलासा मिळाल्याबाबतचा दाखलाही देण्याचा प्रयत्न फैजल यांच्याकडून करण्यात आला, मात्र न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती बी.व्ही .नगररत्न यांच्या खंडपीठाने निकालात म्हटले की, 'फैजल हे खासदार आहेत आणि लक्षद्वीप मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, यात कोणताही वाद नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फायदा त्यांना मिळाला आहे. मात्र त्यांची ही न्यायालयातील प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे. '

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in