उदयपूरची घटना तुमच्यामुळेच, देशाची माफी मागा! सर्वोच्च न्यायालयानं नुपूर शर्मांना फटकारलं

उदयपूरमध्ये नुकताच एका व्यक्तीची निघृण हत्या करण्यात आली आहे.
Nupur Sharma Latest Marathi News, Nupur Sharma case, Nupur Sharma Controversy
Nupur Sharma Latest Marathi News, Nupur Sharma case, Nupur Sharma ControversySarkarnama

नवी दिल्ली : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याबदद्ल भाजपच्या (BJP) निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात आंदोलन, हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. तसेच अनेक मुस्लिमबहुल देशांनी याबाबत उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती. तीन दिवसांपूर्वीच याच कारणावरून उदयपूरमध्ये एका व्यक्तीची निघृण हत्या करण्यात आली आहे. त्यावरून आता सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना चांगलंच फटकारलं आहे. (Nupur Sharma Latest News)

नुपूर शर्मा यांच्या विरोधात महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे सर्व गुन्हे दिल्लीत वर्ग करण्याची मागणी शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) केली आहे. या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने शर्मा यांनी फटकारत देशाची माफी मागण्यास सांगितले आहे.

Nupur Sharma Latest Marathi News, Nupur Sharma case, Nupur Sharma Controversy
...तर एकनाथ शिंदे ११ दिवसांचेच मुख्यमंत्री!

शर्मा यांच्या वक्तव्यामुळे देशात हिंसाचार झाला. उदयपूरमधील घटनाही त्यांच्यामुळे झाली. त्यामुळे त्यांनी टीव्हीवरून संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, अशा शब्दांत न्यायालयाने शर्मा यांना फटकारलं आहे. तसेच गुन्ह्यांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले आहेत.(Nupur Sharma case news updates)

शर्मा यांच्या वकिलांनी न्यायालायत नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने शर्मा यांच्यामुळे संपूर्ण देशात तणाव निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या एकट्याच या तणावाला कारणीभूत असल्याचेही न्यायालय म्हणाले. न्यालायाने दिल्ली पोलिसांवरही ताशेरे ओढले.

शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कोणती पावलं उचलली, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असं म्हणत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर शर्मा यांनी आपली याचिका मागे घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com