supreme court slams gautam gambhir foundation over covid medicines
supreme court slams gautam gambhir foundation over covid medicines

सर्वोच्च न्यायालयाचा दणका..कोरोनावरील औषधांचे वाटप करणारा भाजप खासदार अडचणीत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भाजप खासदाराने फॅबिफ्लू, रेमडेसिव्हीरसह काही औषधांचा साठा करत त्याचे नागरिकांना मोफतवाटपकेले होते.

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेमध्ये भाजपसह अन्य काही पक्षांच्या नेत्यांनी फॅबिफ्लू (Fabiflu), रेमडेसिविरसह (Remdesivir) काही औषधांचा साठा करत त्याचे नागरिकांना मोफत वितरण केले होते. याच प्रकरणात भाजपचे (BJP) खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) अडचणीत आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या संस्थेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही गंभीर यांच्या फाउंडेशनला दिलासा देण्यास आज नकार दिला. 

गौतम गंभीर यांच्या फाऊंडेशनमार्फत कोरोना काळामध्ये नागरिकांना फॅबिफ्लू व इतर औषधांचे वाटप करण्यात आले होते. त्यांच्यासह काही जणांनी या औषधांचा अनधिकृतपणे साठा केल्याच्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. बेकायदा औषधांचा साठा करणे आणि कोरोनाबाधित रुग्णांना फॅबिफ्लू औषधाचे वितरण करण्यात गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी आढळून आल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यावर उच्च न्यायालयाने गौतम गंभीर फाऊंडेशनसह इतरांवर कोणत्याही विलंबाशिवाय कारवाई करण्याचे आदेश औषध महानियंत्रकांना दिले. तसेच वितरक आणि यासंदर्भात अन्य प्रकरणांवरही कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. 

या प्रकरणी गंभीरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या फाउंडेशनविरोधात सुरू असलेला खटला यापुढेही सुरूच राहील, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने दिले. खंडपीठ म्हणाले की, सामान्य जनतेची कोरोनाप्रतिबंधक औषधांसाठी धावपळ सुरू असताना कोणते तरी ट्रस्ट अचानक पुढे येते आणि तुम्हाला औषधे देऊ असे सांगते, हे असे व्हायला नको होते. आमचेही कान जमिनीला असतात त्यामुळे बाहेर काय सुरू आहे हे आम्हाला माहिती असते. आता आम्ही त्याबाबत काहीही बोलणार नाही. 

भाजप कार्यालयातच रेमडेसिव्हीरचे वाटप 
गुजरातमध्येही भाजप कार्यालयातून रेमडेसिविर या औषधांचे वाटप केले जात होते. त्याकाळात या औषधाचा देशभरात मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतरही भाजप कार्यालयात मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा होता. तसेच नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनीही रेमडेसिविर इंजेक्शन खासगी विमानाने आणली होती. त्यावरही मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com