शेतकरी आंदोलनाच्या तिढ्यावर सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला सुनावले

कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. केंद्रातील भाजप सरकारला अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढता आलेला नाही.
supreme court says no improvement in union government and farmer talks
supreme court says no improvement in union government and farmer talks

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून, ते दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्रातील भाजप सरकारला अद्याप तोडगा काढता आलेला नाही. यावरुन सर्वोच्च न्यायालयाने आज नाराजी व्यक्त केली. परिस्थितीत कोणतीच सुधारणा दिसत नाही, असे ताशेरे सरन्यायाधीशांनी ओढले आहेत.  

कृषी कायद्यांना विरोध करीत शेतकरी 42 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. हजारो शेतकरी 26 नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि चिल्ला या सीमांवर हे आंदोलन सुरू आहे. यात पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह अनेक राज्यांतील शेतकरी सहभागी आहेत. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनामुळे मोदी सरकारची कोंडी झाली असली तरी केंद्रातील सर्व मंत्री आणि भाजप नेते या कायद्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. 

कृषी कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर आज सुनावणी झाली. या वेळी सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, आमचा हेतू हा सरकार आणि आंदोलन करणारे शेतकरी यांच्यातील चर्चेला प्रोत्साहन देण्याचा होता. मात्र, परिस्थितीत कोणतीच सुधारणा झालेली दिसत नाही. आम्ही ही परिस्थिती जाणून आहोत आणि चर्चेला प्रोत्साहन देत आहोत. 

शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये दोन दिवसांपूर्वी चर्चेची सातवी फेरी झाली आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत चर्चा करीत आहोत. दोन्ही बाजूंमध्ये समझोता होण्याची काही शक्यता आहे. सकारात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के.के.वेणूगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.  

दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बोलताना किसान मजदूर संघर्ष समितीचे सरवानसिंग पंधेर म्हणाले होते की, कृषिमंत्र्यांनी कोणत्याही स्थितीत कृषी कायदे रद्द करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. कायदे रद्द करायचे असतील तर सर्वोच्च न्यायालयात जा, असेही कृषिमंत्र्यांनी आम्हाला सांगितले. 

शेतकरी नेत्यांसोबत केंद्र सरकारने चर्चा केली असली तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. कृषी कायद्यांत सुधारणा करण्याची सरकारची भूमिका असली तरी शेतकरी मात्र, हे कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. सरकार कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित न ठेवता देशव्यापी करण्यात आले आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com