अभिनेत्रीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा...अखेर साडेचार महिन्यांनंतर तुरुंगातून सुटणार

उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
supreme court grants bail to kannada actress ragini dwiwedi
supreme court grants bail to kannada actress ragini dwiwedi

बंगळूर : प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिच्या घरावर छापे टाकून केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) तिला अटक केली होती. तिला अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तिची तब्बल साडेचार महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका होत आहे. 

सीसीबीने ४ सप्टेंबरला अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिच्या घरावर छापा घातला होता. सीसीबीने रागिनीला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र, तिने वकिलांनी पाठवून मुदतवाढ मागितली होती. मात्र, पोलिसांनी तिला त्याचदिवशी हजर होण्यास सांगितल्याने ती अखेर हजर झाली होती. तिची चौकशी करण्यात आली होती. तिच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती आणि त्यात अनेक बड्या नावांचा समावेश होता. चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली होती. 

कन्नड चित्रपटसृष्टी म्हणजेच सँडलवूडमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तीन जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास करण्यास सुरूवात केली होती. या प्रकरणी निर्माता व पत्रकार इंद्रजित लंकेश याची चौकशी करण्यात आली होती. त्याने चौकशीत सँडलवूडमधील किमान 15 जणांची नावे उघड केली होती. यात रागिनी हिचे नाव असल्याने ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली होती. रागिनी हिचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

रागिनी हिचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर तिचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे. तिला ४ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. आता ती तब्बल साडेचार महिन्यांनंतर कारागृहातून बाहेर पडत आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com