पंतप्रधान मोदींना आव्हान देणारा बडतर्फ जवान आणखी एक लढाई हरला..!

वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे.
Supreme Court dismisses sacked BSF Jawans plea against rejection of his nomination
Supreme Court dismisses sacked BSF Jawans plea against rejection of his nomination

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) जवानांना मिळणाऱ्या निकृष्ठ अन्नाचा प्रश्न जाहीरपणे मांडणारे तेजबहादूर आज सर्वोच्च न्यायालयात आणखी एक लढाई हरले. निकृष्ठ अन्नाचा मुद्दा जाहीरपणे मांडल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर तेजबहादूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी मतदारसंघातून आव्हान दिले होते. मोदींचा वाराणसीतील विजय अवैध ठरवावा, अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. 

बीएसएफमध्ये जवानांना मिळत असलेल्या निकृष्ठ अन्नाचा व्हिडीओ तेजबहादूर यांनी तयार केला होता. या व्हिडीओद्वारे त्यांनी हा प्रश्न सगळ्यांसमोर मांडला होता. त्यांनी 2017 मध्ये  ऑनलाइन पोस्ट केलेल्या या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली होती. याच कारणावरुन नंतर तेजबहादूर यांना बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले होते. 
तेजबहादूर यांनी मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अर्ज भरला होता. परंतु, त्यांचा अर्जच निवडणूक आयोगाने रद्द केला होता. या विरोधात तेजबहादूर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. 

तेजबहादूर यांनी सुरूवातीला अपक्ष म्हणून आणि नंतर समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तेजबहादूर यांचा अर्ज रद्द ठरवला होता. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला होता. 

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तेजबहादूर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर सरन्यायाधीश एस.ए.बोबडे, न्यायाधीश ए.एस.बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी 18 नोव्हेंबरला निकाल राखून ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. तेजबहादूर यांची मागणी फेटाळून उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. 

बाह्य दबावामुळे आपला अर्ज रद्द करण्यात आला, असे तेजबहादूर यांनी म्हटले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझा उमेदवारी अर्ज फेटाळून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी घोषित केले असून, त्यांची विजय अवैध ठरवावा, अशीही मागणी त्यांनी केली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com