सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंना मोठा दिलासा; शिवसेनेची 'ती' याचिका घेतली दाखल करून

Uddhav Thackeray|Shivsena|Supreme Court : निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला पक्षावरील हक्क सांगण्याबाबत नोटीस बजावली आहे.
Supreme Court| Shivsena, Uddhav Thackeray Latest News
Supreme Court| Shivsena, Uddhav Thackeray Latest News Sarkarnam

नवी दिल्ली : शिवसेनेत (Shivsena) वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्दय़ांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दाखल करून घेतली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्या पीठासमोर येत्या १ ऑगस्टला (सोमवारी) याबाबत सुनावणी होणार आहे. या मु्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आमनेसामने आले आहेत. (Supreme Court| Shivsena, Uddhav Thackeray Latest News)

Supreme Court| Shivsena, Uddhav Thackeray Latest News
राज्याला अपंग करुन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीतच व्यस्त

दोन्ही प्रकरणे परस्परांशी संबंधित असल्याने आयोगासमोरील सुनावणीला अर्थ रहात नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेनेने आज न्यायालयात दाखल केला. तो न्यायालयाने मान्य केला असून सुनावणीची तयारी दर्शवली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.

Supreme Court| Shivsena, Uddhav Thackeray Latest News
अर्जुन खोतकरांच्या चेहऱ्यावर शंभर कोटींचे टेन्शन! जाणून घ्या प्रकरण..

१ ऑगस्टला याप्रकरणाबरोबरच शिवसेना आणि शिंदे गटाकडून दाखल इतर याचिकांसंबंधीही सुनावणी होणार आहे. शिवसेना या पक्षावर व त्याच्या निवडणूक चिन्हावर कोणाचा दावा खरा आहे, हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला बजावलेल्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती शिवसेनेने केली होती. या याचिकेवरील सुनावणीला न्यायालयाने मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला पक्षावरील हक्क सांगण्याबाबत नोटीस बजावली आहे. दोन्ही बाजूंना ८ ऑगस्टपर्यंत बाजू मांडण्यास सांगितली आहे. मात्र न्यायालयातील याचिकांवर निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Supreme Court| Shivsena, Uddhav Thackeray Latest News
मंत्रिमंडळ विस्तारास विलंब : मातब्बरांना डावलण्याची शिंदे-फडणवीसांची खेळी?

दरम्यान, शिवसेनेचे म्हणणे ऐकले जाईल असे सरन्यायाधीशांनी सांगितले व तुमचे म्हणणे आम्ही १ ऑगस्टला ऐकू असेही स्पष्ट केले. आमच्यासाठी निश्चितपणे हा दिलासा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com