Sunil Kangolu News : भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' करत कर्नाटकमध्ये काँग्रेसला ऐतिहासिक विजयापर्यत पोहचविणारा 'जादूगार'....

Karnataka Election Results : सुनील कानुगोलू हे 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख घटक होते. त्यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबतही काम केलं आहे.
Sunil Kangolu News
Sunil Kangolu News Sarkarnama

Karnataka : गेल्या काही महिन्यांपासून भाजपचं बोम्मई सरकार तरणार की काँग्रेस विजयाला गवसणी घालणार यासाठी उत्कंठा शिगेला पोहचलेल्या कर्नाटक विधानसभेचा निकाल अखेर हाती आला आहे. या निवडणुकीत १३५ च्या वर जागा जिंकत बहुमतानं सत्ता काबीज केली आहे. तर मागच्या निवडणुकी इतक्या जागा राखण्यातही भाजपला यश आलं नाही. सपाटून मार खाललेल्या भाजपच्या अपयशाला जसे अनेक कारणं आहेत तसेच काँग्रेसच्या यशाच्या श्रेयालाही तितकेच दावेदार समोर येत आहे. पण कर्नाटकमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत काँग्रेसला ऐतिहासिक विजयापर्यंत पोहचविणारा पडद्यामागचा खरा चेहरा, जादूगार सुनील कानुगोलू ही व्यक्ती आहे.

कर्नाटक विधानसभा(Karnataka Election) निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसमध्ये श्रेयात राहुल गांधी यांच्यापासून ते मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यापर्यंत अनेक नावं पुढं येत आहे. मात्र,या ज्येष्ठ नेत्यांसोबतच आता सुनील कानुगोलू यांचं नाव देखील प्रचंड चर्चेत आहे. अत्यंत साधं राहणीमान, संवादी, विनयशील, दांडगा जनसंपर्क आणि परफेक्ट प्लॅनिंग,अचूक टायमिंग असं या कानुगोलू यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. ते मूळचे कर्नाटकचे असूनही चेन्नईत वाढले. सुनील राजकीय क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय आहेत.

Sunil Kangolu News
Rahul Gandhi on Karnataka Election 2023: राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकात आता द्वेषाचे दुकान बंद आणि प्रेमाचे दुकान सुरु...

गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि रणनिती आखण्यास सुरुवात केली. राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेचं श्रेयही त्यांनाच जातं. विशेष म्हणजे, कर्नाटकातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपसोबत काम केलं होतं. त्यावेळीही सुनील यांनी पक्षाला विजय मिळवून दिला होता.

काँग्रेसनं सुनील कानुगोलू यांना निवडणूक रणनीतीकार म्हणून मागील वर्षी मार्चमध्ये पक्षात स्थान दिलं होतं. काँग्रेसनं गेल्या वर्षी मे महिन्यात 2024 साठी टास्क फोर्सची स्थापना केली होती. यामध्ये निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू(Sunil Kanugolu) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांनी 2014 च्या आधी प्रशांत किशोर यांच्यासोबतही काम केलं होतं.

Sunil Kangolu News
MNS News: कर्नाटक निकालावरुन मनसे नेत्याचा फडणवीस,ठाकरेंवर निशाणा; '' महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या...''

मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख घटक

सुनील कानुगोलू हे 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख घटक होते आणि त्यांनी भाजपच्या असोसिएशन ऑफ बिलियन माइंड्स (ABM)चे प्रमुख म्हणून काम केलं आहे. त्यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपच्या निवडणूक प्रचारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सर्व निवडणुकांमध्ये भाजप जिंकला किंवा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला

कानुगोलू यांची 'ही' होती स्ट्रॅटेजी...

सुनील कानुगोलू यांनी प्रचाराच्या नवनवीन पद्धती, जनतेच्या मनातले मु्द्दे जाणनू घेण्यासाठीची असंख्य सर्वेक्षणं, तसेच एकीकडे विकासाच्या मुद्द्यांना उचलून धरतानाच दुसरीकडं भ्रष्टाचार, गैरकारभाराच्या आरोपात अडकलेल्या भाजपच्या नेतेमंडळींचा पर्दाफाश करण्यासाठी आक्रमक रणनीती आखली. प्रचारादरम्यान तिची प्रभावीपणे अंमलबजावणी देखील केली. उमेदवारांना निवडून आणण्यात कानुगोलू यांची रणनीती यशस्वी झाल्याचं कर्नाटक निकालांवरुन स्पष्ट झालं आहे.

Sunil Kangolu News
Karnataka Election Result : मागील वेळापेक्षा 56 जागा अधिक; काँग्रेसचा कसा चढत गेला आलेख?

यापुढे महत्वाची धुरा....

राजस्थान आणि छत्तीसगडमधील आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. त्याची जबाबदारीही सुनील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयापर्यंत नेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, विविध राज्यात काँग्रेसला बळकट करण्याची जबाबदारी सुनील कानगोलू यांच्याकडे पक्षाने दिल्याची माहिती आहे.

'भारत जोडो' यात्रेतही कानुगोलूंचा महत्वाचा रोल...

राहुल गांधीं(Rahul Gandhi)च्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेतही कानुगोलू यांचा रोल महत्वाचा होता. कर्नाटकातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपसोबत काम केलं होतं. त्यावेळीही सुनील यांनी पक्षाला विजय मिळवून दिला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in