केंद्रीय गृह सचिवांच्या नावाने दोनशे कोटींची वसुली अन् तीही जेलमध्ये बसून!

विशेष म्हणजे पैसे उकळले तेव्हा हा आरोपी कारागृहात होता. कारागृहात बसून त्याने दोनशे कोटी रुपयांचा गंडा घातला.
केंद्रीय गृह सचिवांच्या नावाने दोनशे कोटींची वसुली अन् तीही जेलमध्ये बसून!

Sukesh Chandrashekhar 

Sarkarnama

मुंबई : रॅनबॅक्सी (Ranbaxy) कंपनीच्या सहसंस्थापकाच्या पत्नीकडून एका व्यक्तीने केंद्रीय गृह सचिवांच्या दोनशे कोटी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पैसे उकळले तेव्हा हा आरोपी कारागृहात होता. कारागृहात बसून त्याने दोनशे कोटी रुपयांची वसुली केली होती. या आरोपीचे नाव सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) असे आहे. अनेक बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्रींसोबतही त्याची मैत्री असल्याचे उघड झाले आहे.

सुकेश याच्याविरुद्ध सक्त वसुली संचालनालयाने (ED) आरोपपत्र दाखल केले आहे. यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. रॅनबॅक्सीचे सहसंस्थापक शिविंदरसिंग यांना 2019 मध्ये करचुकवेगिरी प्रकरणात अटक झाली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नी आदिती सिंग यांच्याबाबत हा प्रकार घडला होता. सुकेशने कारागृहातून आदिती यांच्याशी संपर्क साधला होता. केंद्रीय गृह सचिवांच्या नावाने तो बोलत होता. शिविंदरसिंग यांच्या सुटकेसाठी त्याने पैशांची मागणी केली होती.

<div class="paragraphs"><p>Sukesh Chandrashekhar&nbsp;</p></div>
जॅकलिन अन् नोरानंतर आता आणखी बड्या अभिनेत्री रडारवर

अनेक महिने तो शिविंदरसिंग यांच्या सुटकेसाठी आदिती यांच्याकडून पैसे उकळत होता. त्याने तब्बल दोनशे कोटी रुपये त्यांच्याकडून घेतले. केंद्रीय गृह सचिवांच्या नावाखाली त्याचा हा सगळा प्रकार कारागृहात बसून सुरू होता. त्याच्याकडे कारागृहात असतानाही मोबाईल होता आणि त्याने वापरलेल्या सॉफ्टवेअरमुळे समोरच्या व्यक्तीला त्याच्या मोबाईलवरून केंद्रीय गृह सचिवांना फोन येतोय हे दाखवता येत असे. इतर महत्वाच्या व्यक्तींच्या नावानेही त्याला फोन करता येत असत. याचाच फायदा घेऊन तो खंडणी उकळत होता.

<div class="paragraphs"><p>Sukesh Chandrashekhar&nbsp;</p></div>
मुलांचे लग्नाचे वय 21 वरुन 18 करा! ओवेसींची मोदी सरकारकडे मागणी

अखेर आदिती यांना फसवणूक होऊ लागल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे सुकेशसोबत मोबाईवर झालेले सगळे संभाषण त्यांनी रेकॉर्ड केले होते. सुकेशने ज्या अधिकाऱ्यांची नावे घेऊन पैसे उकळले त्यांनी तक्रार केली नव्हती. कारण त्यांच्यापर्यंत सुकेशने पैसे पोचवले नव्हते. अखेर आदिती यांनीच तक्रार केली आणि दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा नंतर ईडीकडे आला आणि सुकेश जाळ्यात अडकला. सुकेश हा 2017 पासून कारागृहात असून, तो कोट्यवधी रुपयांची खंडणी गोळा करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.