बाहरेचा रस्ता दाखवताच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं पहिलं केलं 'हे' काम!

भाजपने गुरूवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली.
बाहरेचा रस्ता दाखवताच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं पहिलं केलं 'हे' काम!
Subramanian Swamy and Narendra Modi

नवी दिल्ली : भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आर्थिक धोरणांवर टीका करत असतात. या टीकेनंतर त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलं. आता स्वामी यांनीही भाजपशी आपले 'सोशल' नाते तोडले आहे.

भाजपने गुरूवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीमधून स्वामींना वगळण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून स्वामी हे आपल्याच सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. तसेच, वरूण गांधी आणि त्यांच्या मातोश्री खासदार मेनका गांधी यांनाही कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आलेला आहे. त्यानंतर स्वामी यांनी ट्विटर व फेसबुकवरील आपल्या प्रोफाईलमध्ये लगेचच बदल केला आहे.

Subramanian Swamy and Narendra Modi
पंतप्रधान मोदींना मिळालेल्या वस्तूंच्या लिलावात एका भाल्याने केली कमाल!

ट्विटरसह फेसबुकवरही स्वामी यांनी आपल्या प्रोफाईलमधून भाजपला उल्लेख काढून टाकला आहे. आधी कार्यकारिणी सदस्य असा उल्लेख होता. पण आता त्यांच्या प्रोफाईलमध्ये कुठेही भाजपला उल्लेख नसल्यानं ते भाजपपासून खूप दुरावल्याची चर्चा आहे. स्वामी हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. भाजपच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीही होते. पण आता कार्यकारिणीतूनही त्यांना डच्चू दिल्यानं स्वामी यांनी हे पाऊल उचललं आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व मिथुन चक्रवर्ती यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे. याचवेळी शेतकरी आंदोलनावरून सरकार टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री चौधरी विरेंदरसिंह यांनाही वगळलं आहे. लखीमपूर घटनेवर बोलणारे भाजपचे एकमेव नेते खासदार वरूण गांधी यांनाही कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही.

Subramanian Swamy and Narendra Modi
नवाब मलिकांच्या आरोपानंतर मनीष भानुशालीने केला धक्कादायक दावा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्वामींना स्थान देण्यात आले नाही, याबाबत एका व्यक्तीने स्वामी यांनी ट्विटरवर छेडले होते. तुम्हाला मंत्रिपद न मिळाल्याने तुम्ही भाजप सरकारवर टीका करीत आहात, असा आरोप त्या व्यक्तीने केला होता. यावर स्वामी यांनी उत्तर देताना थेट मोदींवर निशाणा साधला होते. त्यांनी म्हटले होते की, मी मोदीविरोधी आहे. माझा मोदींच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांना विरोध आहे. यासंबंधी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींशी समोरासमोर चर्चा करण्यासही मी तयारी आहे. तुम्ही सहभागाच्या तत्वावर चालणारी लोकशाही ऐकली आहे का? मोदी हे काय भारताचे राजे नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.