भाजपची डोकेदुखी वाढली; उत्पल पर्रीकरांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढतोय!

उत्पल पर्रीकर यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
Utpal Parrikar Election Campaign
Utpal Parrikar Election CampaignSarkarnama

पणजी : गोव्याचे (Goa) दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपने (bjp) त्यांना तिकीट नाकारले होते. आता पर्रीकर यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नेते सुभाष वेलिंगकर यांनी पर्रीकरांना पाठिंबा दिला आहे.

पणजी मतदारसंघातील मनोहर पर्रीकर यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे प्रा.सुभाष वेलिंगकर यांनी उत्पल यांना पाठिंबा दिला आहे. संघाचा गोवा प्रांत वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला होता. नंतर मतभेद झाल्याने ते बाहेर पडले होते. उत्पल यांनी वेलिंगकर यांची आज भेट घेतली. उत्पल यांनी वेलिंगकरांचे आशीर्वाद घेतले आहेत. वेलिंगकर यांचे पुत्र शैलेंद्र हे पणजीतून शिवसेनेकडून मैदानात उतरले होते. मात्र, त्यांनीही उत्पल यांच्यासाठी माघार घेतली आहे. उत्पल हे अपक्ष लढत असले तरी भाजपमधील घटकांसोबत विरोधी पक्षांनाही पाठीशी उभे करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

उत्पल यांना काँग्रेस आणि आम आदमी पक्ष वगळता भाजपविरोधी प्रत्येक पक्षाकडून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसने माजी महापौर उदय मडकईकर यांना तिकीट नाकारले होते. त्यामुळे त्यांनी पणजीतून बंडखोरी केली होती. त्यांनीही उत्पल यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याचबरोबर तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आघाडी लवकरच पणजीचा निर्णय घेणार आहे. त्यांच्याकडूनही उत्पल यांना पाठिंबा मिळू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Utpal Parrikar Election Campaign
अँटिलिया प्रकरण अन् मनसुख हिरेन हत्येचे गूढ अखेर उलगडणार

उत्पल पर्रीकर अपक्ष उभे राहिल्यास पाठिंबा देऊ, असे शिवसेनेने यांनी जाहीर केले होते. शिवसेनेकडून हा शब्द पाळण्यात आला आहे. शिवसेनेचे पणजीतील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर अर्ज मागे घेतला. त्यामुळे पर्रीकर यांची ताकद निश्चितच वाढणार असल्याचे बोलले जात आहे. पर्रीकर हे भाजप सोडण्याआधीपासूनच ते अपक्ष उभे राहिल्यास पाठिंबा देऊ, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली होती.

Utpal Parrikar Election Campaign
भारताची खोडी काढून चीन तोंडघशी; अमेरिकेने थेट तंबीच दिली

दरम्यान, उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने गोव्यातील राजकारणाला (Goa Politics) वेगळं वळण मिळालं आहे. त्यामुळे भाजपची पणजी मतदारसंघात डोकेदुखी वाढली आहे. उत्पल पर्रीकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी भाजपसमोर त्यांनी एकमेव अट ठेवली होती. ती अट म्हणजे, भाजपने पणजीतून चांगला उमेदवार द्यावा. भाजपने चांगले उमेदवार दिल्यास ते माघार घेतील, असे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. भाजप सोडण्याचा निर्णय अतिशय अवघड होता, असेही त्यांनी म्हटले होते. परंतु, भाजपने पणजीतून बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी कायम ठेवल्याने पर्रीकर यांनी लढण्याचा निर्णय कायम ठेवला. (Utpal Parrikar News Updates)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com