काँग्रेसचे चार आमदार क्रॉस व्होटिंग करणार! भाजप पुरस्कृत उमेदवाराचा गौप्यस्फोट

ही संधी गमावल्यास ते 2028 पर्यंत मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत
Subhash Chandra and Vasundhara Raje
Subhash Chandra and Vasundhara Raje Sarkarnama

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपने (BJP) राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी ऐनवेळी उमेदवाराला मैदानात उतरवून डाव टाकला आहे. यामुळे राजकारण तापलं आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) मैदानात उतरले आहेत. चंद्रा हे मैदानात उतरल्यामुळं काँग्रेसची (Congress) कोंडी झाली आहे. यातच काँग्रेसचे चार आमदार क्रॉस व्होटींग करणार असल्याचा गौप्यस्फोट चंद्रा यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. (Rajya Sabha Election News Updates)

आता चंद्रा यांनी विजयाचा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस आमदारांकडून होणाऱ्या क्रॉस व्होटींगमुळं मी विजयी होणार आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांचे पिता राजेश पायलट हे माझे मित्र होते. सचिन पायलट हे तरुण आणि लोकप्रिय नेते आहेत. त्यांना आताच संधी आहे. या संधीचा वापर करून ते सूड उगवू शकतात अथवा संदेश देऊ शकतात. पायलट यांनी ही संधी गमावल्यास ते 2028 पर्यंत मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत.

Subhash Chandra and Vasundhara Raje
समाजवादी पक्षानं वाढवलं शिवसेनेचं टेन्शन! अखिलेश यादवच आता निर्णय घेणार

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामात जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तिवारी यांच्या बाहेरचा असा शिक्का राज्यातील काँग्रेस नेते मारत आहेत. तिवारींच्या उमेदवारीबद्दल पक्षातील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. यातच आता भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवून काँग्रेसला धक्का दिला आहे. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

Subhash Chandra and Vasundhara Raje
राजकीय गोळाबेरजेसाठी अनिल परब उतरले मैदानात; 'सप'च्या आमदाराची घेतली भेट

चंद्रा यांच्या एंट्रीमुळं राज्यसभेच्या चार जागांसाठी आता राजस्थानमध्येे आता पाच उमेदवार मैदानात आहेत. माजी मंत्री घनश्याम तिवारी हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असे दोन गट आहेत. काँग्रेसने तिवारी यांच्यासह प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिलेले हे तिन्ही उमेदवार राज्याबाहेरील असल्यानं आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्याच्या हेतूने भाजपने राज्यसभेसाठी चंद्रा यांना पाठिंबा जाहीर करून त्यांना निवडणुकीत उतरवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com